फोटो सौजन्य - Social Media
धीरज, राज, प्रमोद, शरद आणि तसेच संपूर्ण ऑफिसचं मंडळ मजामस्ती म्हणून दिलीपच्या गावी जायचं ठरवतात. दिलीपचं गाव रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात आहे. मुंबईच्या जुईनगरहून सगळी मंडळी रात्री ऑफिसचे कामे हुरकून अगदी बाराच्या सुमारास निघाली. गाव तसे फक्त ९३ किमी दूर! त्यामुळे प्रवास फक्त ३ तासांचा होता. बाराचा काटा घड्याळ सोडताच या पठ्ठयानी जुईनगरही सोडले. गाडी भरधाव वेगाने कोकणाच्या वाटेने मार्गस्थ झाली. गाडीत सगळीजणं आनंदात होती पण त्यांना काय माहित? हाच प्रवास त्यांना त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या थराराचे दर्शन घडवणार आहे.
पनवेलच्या पळस्पे फाट्यावर गाडी पोहचली. गाडी मुंबई-गोवा महामार्ग म्हणजेच NH 48 वर वेगाने धावू लागली. गाडीचा चालक तसा कोकणातल्या रस्त्यांशी पारखी होता. पण या प्रवासात तोच असा एक व्यक्ती होता, ज्याच्या मनात प्रवासाची सुरुवात होण्यापासून एक कसलीतरी किणकिण होती. पण त्याला भलताच आत्मविश्वास होता. खरं तर! दिलीपच्या गावी जाण्यासाठी कोलाडवरून उजव्या बाजूला गाडी घ्यावी लागते पण या चालकाने वडखळ सोडताच आडमार्ग निवडला. हा असा मार्ग आहे, जो बऱ्याच जणांना ठाऊकही नाही. दिलीप तसा गावचा राहणारा होता त्यामुळे त्यालाही हा रस्ता माहीत होता पण तोही या रस्त्याने फारसा गेला नव्हता. चला, चालकाला माहिती आहे तर टेन्शन काय? त्यामुळे तोही चालकाला काय म्हंटला नाही.
चालक त्याही आडमार्गावर भरधाव वेगाने गाडी चालवत होता. पण तेवढ्यात त्याला जाणवले की या रस्त्यावर आपण एकटेच चालले होते. तासभर झाला एकही गाडी आपल्याला पास झाली नाही. Back Mirror मध्ये एकही गाडी दूरदूरपर्यंत दिसत नाही आहे. घड्याळात तीनचा काटा झाला. आतापर्यंत तर आपण दिलीपच्या गावी पोहचायला हवे होतो. असे अनेक प्रश्न, विचार चालकाच्या मनात आले पण त्याने मागे पाहिले की दिलीप झोपला आहे आणि बाकीची मंडळी छान मज्जे करत आहेत, कुणालाही कसले भान नाही त्यामुळे चालकाने त्यांना उगाच टेन्शन देण्यापेक्षा गाडी जातेय तशी जाऊंदे असा विचार केला.
मुळात, त्या रस्त्यावर एकही घाट लागत नाही. तिथे कोणताही घाटमार्ग अस्तित्वातही नाही पण या लोकांना अचानक त्या मार्गावर घाट लागतो. चालक घाबरून जोरात किंचाळतो. सगळे आपल्या धुंदीतून बाहेर येतात. झोपलेला दिलीपही तिच्या गोड स्वप्नांतून जागा होतो. चालक सगळ्यांना म्हणतो की आपल्या घड्याळात किती वाजलेत ते पहा! सगळे म्हणतात साडे तीन… तेव्हा चालक म्हणतो तसा हा प्रवास तीन तासांचा होता. आपल्याला रस्त्यात कोणतीही ट्रॅफिक लागली नाही काही नाही, तरीही आपण आपल्याला उशीर का होतोय? मला काहीच कळत नाहीये. त्यात अचानक हा घाट सुरु झालाय. मुळात, या ठिकाणी कोणताही घाटमार्ग अस्तित्वात नाहीये. हे ऐकून सगळ्यांची तारांबळ उडते.
आपल्या आजूबाजूने गेले दीड ते दोन तास एकही गाडी पास झाली नाही. ही गाडी अचानक घाटाच्या माथ्यावर बंद पडते. गाडीत असलेली सगळी जणं आणखीन घाबरतात. चालक गाडीतून उतरतो आणि गाडी तपासू लागतो. दिलीपही त्याच्याबरोबर गाडीच्या बाहेर उतरतो. घड्याळात पावणे चार झालेले असतात. दिलीप घड्याळ पाहून म्हणतो, फारच उशीर झाला रे! सरळ कोलाडकडून आत गेलो असतो का तुला नसते ते उपाय सुचले? धीरज आणि प्रमोदही गाडी बाहेर येतात. तेव्हा अचानक त्यांच्यासमोर काठी टेकत एक म्हातारा येतो. एक असा घाट जो ना तिथे कधी या लोकांनी पाहिला आणि ना ही ऐकला, त्या घाटात एक म्हातारा काठी टेकत येतो. या लोकांशी बोलू लागतो. तेव्हा चालक त्याला त्या गावाचे नाव विचारतो. म्हातारा हसतो पण काहीच सांगत नाही. चालक बोलता-बोलता त्या म्हाताऱ्याच्या थोडं जवळ येतो, त्याला त्या म्हाताऱ्याच्या अंगातून अतिशय घाण दुर्गंध येतो. त्यामुळे तो मागे सरकतो. मागे राहून तो त्याला विचारतो, “बाबा, या घाटातून आम्हाला बाहेर जायचंय? सरळच रस्ता आहे ना?” तेव्हा तो म्हातारा त्यांना सांगतो की “बावा, येथे तुम्ही तुमच्या मर्जीने येता, येथून तुम्ही बाहेर जाणार ते फक्त माझ्या मर्जीने!” म्हाताऱ्याचे ते बोल ऐकून, सगळे घाबरून जातात. सगळ्यांना प्रश्न पडतो की हा म्हातारा असा का बोलतोय? तेव्हा दिलीपची नजर म्हाताऱ्याच्या पायाकडे जाते. म्हाताऱ्याचे पाय उलटे असतात.
दिलीप ही गोष्ट कुणालाच सांगत नाही. तो म्हाताराही दिलीपकडे पाहू लागतो. दिलीप घाबरलेल्या नजरेने त्या म्हाताऱ्याकडे पाहत असतो. म्हातारा म्हणतो “मला जे हवंय, ते तुम्ही मला द्या, मगच तुमची यातून सुटका! ज्यांनी माझी इच्छा पूर्ण केली, तेच यातून बाहेर पडले. लवकर माझी इच्छा पूर्ण करा नाही तर ते मागून येतच आहेत, ते तुम्हाला त्यांच्याबरोबर घेऊन जातील” हे ऐकून सगळ्यांची तारांबळ उडते. तेव्हा चालक घाबरत त्यांना विचारतो “बाबा, तुम्हाला हवंय तरी काय?” तेव्हा ते म्हणतात तीच जी तुम्हाला माझ्यापर्यंत घेऊन आलेय.
तेव्हा हे सगळे विचारात पडतात. तेव्हा दिलीपला त्याने मागे गाडीच्या डिक्कीत ठेवलेल्या चिकनची आठवण येते. तो तसाच पळत डिक्कीच्या इथे जातो आणि ते चिकन बाहेर काढतो आणि त्या म्हाताऱ्याला देतो. म्हातारा ते कच्चे चिकन हैवानासारखा खाऊ लागतो. तेव्हाच चालकाला अचानक देवाची आठवण येते. तो जोरजोरात हनुमानाचे नामस्मरण करायला लागतो आणि अचानक तो म्हातारा थरथरू लागतो आणि गायब होऊन जातो. गाडीही अचानक सुरु होते. ही सगळीजणं गाडीत बसतात आणि देवाचे नामस्मरण करत, रस्ता दिसेल तिथे गाडी पळवू लागतात. पण तरीही गाडी त्या घाटातून उतरत नाही, एकाच ठिकाणी ते वारंवार फिरत असतात.
तेव्हा दिलीपला आठवत की गाडीत आणखीन काही तरी आहे, ज्याची भूक इथल्या भुतांना आहे. दिलीप तन्वीला विचारतो की तू डब्बा भरून काय आणलं आहेस? तन्वीने डब्बा भरून सुकट आणलेली असते. दिलीप जोरात ओरडत म्हणतो आधी तो डब्बा बाहेर फेक. तन्वी लगेच तो डब्बा बाहेर फेकते आणि जवळजवळ काहीच मिनिटांत ते घाट उतरतात आणि पुन्हा त्या वडखळच्या नाक्यावर येऊन पोहचतात, जेथून चालकाने हा थरार सुरु होण्याआधी शॉर्टकट म्हणून उजव्या बाजूला आत गाडी घेतली होती.
चालक आणि सगळीजणं विचारात पडतात. दिलीप त्याच्या घड्याळात वेळ पाहतो. घड्याळात आताही पावणे चारच झाले असतात. वेळ तिथेच थांबून असते. दिलीपही गोष्टही लपवून ठेवतो, तो चालकाला म्हणतो की आता महामार्गालाच गाडी ठेव. दिलीप थोड्या वेळाने पुन्हा घड्याळ चेक करतो आणि सुटकेचा श्वास सोडतो, घड्याळात चार वाजलेले असतात. थांबलेली वेळ पुढे गेली म्हणजे ते या थरारातून बाहेर आले असतात. तसेच चार वाजले म्हणजे ब्रह्ममुहूर्तही सुरु झालेला असतो. अगदी अर्ध्या तासात ते त्यांच्या ठिकाणी पोहचतात पण हा घडलेला थरार त्यांच्या मनात भीती निर्माण करते.






