फोटो सौजन्य - Social Media
ही गोष्ट तेव्हा घडली आहे जेव्हा वीज फार फार शहरातच पोहचली होती. गावखेड्यात प्रकाशाचे साधन म्हणजे आकाशात पडणारं चांदणं! त्या चांदण्याच्या प्रकाशात वाट काढत आधी गावकरी प्रवास करत असे. सोलापूरच्या गावखेड्यात आजही तशी फार सुविधा नाहीये. पण आधी परिस्थिती त्याहून बिकट होती. त्याचाच काही अनुभव राजवीर, रमेश आणि रुद्राक्षने घेतला. धडकी भरवणारा हा अनुभव त्या तिघांनी समोर पाहिला आणि अनुभवला होता.
ते तिघे, जवळजवळ १६ वर्षांचे असतील. शाळेच्या कामानिमित्त तालुक्यातून घरी परतत असताना त्यांना साडे 12 झाले होते. त्या अंधारातून वाट काढत त्यांना घरी जायचे होते. ST स्टॅन्डवर त्यांना ST ने तर सोडले पण घराकडे जाताना त्यांना उगाच लांब वाटेने जाण्याचा नसता तो शहाणपणा सुचला. त्यांनी भररानातून जाणारी वाट निवडली. तिघे एकमेकांची मज्जा घेत, रस्त्यावर चालत होते. रुद्राक्ष हा नावाप्रमाणे मुळीच नव्हता. तो त्यांच्यातील सगळ्यात वाया गेलेला मुलगा होता. अगदी लहानपणीच तो व्यसनाधीन झाला होता.
ते तिघे आत रानात पोहोचलेच होते. रुद्राक्षने खिशातून तंबाखूची पुढी काढली आणि मळू लागला. राजवीर आणि रमेश, दोघेही एकमेकांशी संवाद साधत होते. तेव्हा रुद्राक्षची नजर समोर दूरवर एका झाडावर गेली. झाडावर पांढरा पोशाख घातलेले तीन माणसं झाडावर लटकले होते. तिघांनी पांढऱ्या रंगाची टोपीही परिधान केली होती. एक तर उलटा लटकून या तिघांकडे पाहत होता. त्यानेच दूरवरून रुद्राक्षला हाक मारली, ते ही त्याच्याच नावाने! त्या उलट्या लटकलेल्या भुताने रुद्राक्षला थोडा माझ्यासाठीही तंबाखू मळ असं सांगितलं, ते ऐकून हे तिघे त्या जागेवरून पळत पुन्हा ST स्टॅण्डवर आले.
ते तिघे इतके घाबरले होते की त्यांनी सकाळ होईपर्यंत ST स्टॅन्ड सोडलाच नाही. त्यांनी सकाळ होण्याची वाट पाहिली. माणसांची येजा सुरु होताच त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. आजही ते त्या वाटेवरून दिवसाही जाण्याला घाबरतात.
टीपः हा लेख केवळ मनोरंजन आणि माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा Navarashtra.com चा हेतू नाही.






