फोटो सौजन्य - Social Media
नात्यामध्ये भांडण होणे सामान्य आहे. जिथे प्रेम आहे तिथेच भांडण असतात. जर तुमच्या नात्यात भांडण नाही तर तुमच्या पार्टनरला तुमची फार काही पडलेली नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की जितके भांडण तितके प्रेम! नात्यात भांडणालाही महत्व आहे. पण या गोष्टी योग्यरीत्या हाताळता आले पाहिजे. अन्यथा प्रकरण वाढले की नाते बिघडू लागते आणि शेवटी तुटते. तुमच्या नात्याला तुटण्यापासून वाचवण्यासाठी भांडणात तोंडावर काही प्रमाणात चिकटपट्टी असणे आवश्यक आहे. शब्द सांभाळले तरच नात्याला सांभाळू शकाल. शब्द जास्त बोचरे असतात.
नात्यामध्ये असताना तुमच्या पार्टनरला कधीच जुन्या चुकांची आठवण करून देऊ नका. त्या चुका झाल्या त्या झाल्या आता तेच तेच पुन्हा-पुन्हा बाहेर काढू नका. ‘तू नेहमी अशीच करतेस’, ‘तू अशीच आहेस’ असे म्हणणे म्हणजे जोडीदाराला गिल्टमध्ये टाकणे असते. तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करत आहात, ही गोष्ट ध्यानात असुद्या. पण जर त्याच त्याच चुका वारंवार घडत असतील तर त्या विषयी स्पष्ट संवाद गरजेचा असतो. भूतकाळ असणे आणि भूतकाळाशी अजूनही जोडलेले असणे, वर्तमानाला आणि भविष्याला ठेच देणारे असते.
भांडण होत असतात पण त्यासाठी संवाद कधीच थांबवू नका. विचार करून बोला. पण बोला! संवाद थांबला म्हणजे नातं तुटण्याच्या मार्गाकडे निघाला. एकमेकांना एकवेळ शिव्या घाला पण संवाद थांबवू नका. प्रेम असेल तर माफी मिळेल. लक्षात असू द्या, आपल्यावर खरोखर प्रेम करणारा व्यक्ती वेळ घेईल पण आपल्या चुकांना पदरातही घालेल. ‘मला तुझ्याशी बोलायचं नाही’ असे शब्द कधीच वापरू नका. याउलट समोरच्याला काय चुकलंय? या गोष्टी कळूद्या.
रागारागात कधीही ‘आपण कधी भेटलोच नसतो तर चांगलं झालं असतं” असं कधीच म्हणू नका. प्रत्येकाला त्याचं प्रेम नाही मिळत, तुम्हाला मिळालं आहे तर त्याची कदर करा. त्याचा सम्मान करा. त्याला तुमच्यापासून दूर कधीच जाऊन देऊ नका. ते जिथे जाईल, तिथे त्याचा मागे मागे जा. तोंडावर राग असला तरी हृदयाच्या आत तुम्ही असालच!