नीता अंबानीच्या साडीने वेधले लक्ष (फोटो सौजन्य - Instagram)
नीता अंबानी यांना व्यवसायासोबतच फॅशनचीही चांगली जाण आहे. आकर्षक कपडे, मौल्यवान दागिने, पारंपारिक पोशाखांपासून ते स्टेटमेंट ॲक्सेसरीजपर्यंत, नीता अंबानीचे वॉर्डरोब हे अनेक फॅशनिस्टांसाठी फक्त एक स्वप्न आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. त्याआधी पालघरमध्ये अंबानी कुटुंबीयांनी सामूहिक विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती.
यावेळी नीता अंबानी यांच्यावरून नजर हटत नव्हती. नीता अंबानी यांच्या लाल रेशमी साडीचीच सोशल मीडियापासून सगळीकडे चर्चा रंगली आहे. कशी आहे नीता अंबानी यांची ही साडी आणि काय आहे वैशिष्ट्य जाणून घ्या (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
लाल मुलायम रेशमी साडी
नीता अंबानीच्या साडीवरील गायत्री मंत्र (फोटो सौजन्य – Instagram)
नीता अंबानी यांनी लाल रंगाची रेशमी साडी नेसलीहोती, ज्यावर पवित्र ‘गायत्री मंत्र’ लिहिलेला होता आणि सोनेरी धाग्यांमध्ये काही अनोखे नक्षीकाम करण्यता आले होते. नीता अंबानीच्या या क्लासी साडीच्या काठावरही सोनेरी रंगाचे पक्षी बनवले होते. सामूहिक विवाह सोहळ्यासाठी नीता अंबानीने अनोखी आणि युनिक अशी साडी परिधान केली होती.
युनिक दागिने
दागिन्यांचा साज (फोटो सौजन्य – Instagram)
नीता अंबानी यांनी यावेळी सुंदर ‘गुट्टापुसलु’ नेकलेस आणि मोठ्या स्टड इअररिंग्स यावेळी साडीसह मॅच केलेल्या दिसून आल्या. अत्यंत पारंपरिक आणि मोहक अशा नीता अंबानी या साडी आणि दागिन्यांमध्ये दिसून येत होत्या आणि त्यांच्यावरून नजर हटवणंही कठीण आहे.
पारंपरिक अंबाडा गजरा
गजऱ्यासह हेअरस्टाईल (फोटो सौजन्य – Instagram)
नीता अंबानी यांनी या साडीसह मधून भांग पाडत आंबाडा घातला आहे आणि त्यामध्ये सुंदरसा गजराही माळला आहे. मात्र नेहमीच्या पद्धतीने हा गजरा नसून संपूर्ण आंबाड्यावर गजरा माळण्यात आला असून लाल साडीवर याचा लुक अधिक सुंदर आणि मनमोहक दिसतोय.
पोटलीवर कृष्णाची छवी
कृष्णाच्या प्रतिमेची खास पोटली (फोटो सौजन्य – Instagram)
या साडीसह नीता अंबानी यांनी लाल रंगाची आणि त्यावर गोल्डन एम्ब्रोयडरी करण्यात आलेली पोटलीही घेतली आहे. या पोटलीने विशेष लक्ष वेधले कारण त्यावर कृष्णाची सुंदर प्रतिमा कोरण्यात आली आहे. या साडीसह परफेक्ट मॅच असणारी ही पोटली नक्कीच कमालीची फॅशन आहे.
सटल मेकअप
मेकअपसह सौंदर्य (फोटो सौजन्य – Instagram)
नीता अंबानी यांनी या लाल रेशमी साडीसह सटल मेकअप केलाय. डार्क कोरीव भुवया, आयलायनर, मस्कारा, आयलॅशेस, डार्क आयशॅडो, गालावर हायलायटर आणि लाल रंगाची लिपस्टिक लावत त्यांनी हा लुक पूर्ण केलाय. मात्र संपूर्ण भारतीय लुकवर त्यांनी अधिक लक्ष दिलं आहे. तर ठसठशीत लाल टिकली लावत त्यांनी लुक पूर्ण केलाय.