ममेरू सोहळ्यात नीता अंबांनींचा लुक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
नीता अंबानी आणि त्यांची स्टाईल म्हणजे एखाद्याचे डोळे दिपतील अशी आहे. नीता अंबानी नेहमीच क्लासी आणि एलिगंट साड्यांमध्ये दिसून येतात. सध्या अंबानी कुटुंबातील सर्वात लहान असणाऱ्या अनंत अंबानीच्या लग्नाची धुमधाम सुरू आहे. राधिका मर्चंटसह अनंत 12 जुलै रोजी विवाहबद्ध होणार आहे.
या विवाहाच्या पूर्वी होणाऱ्या विधींना सुरूवात झाली असून नुकताच ममेरू सोहळा संपन्न झाला. यावेळी सर्वांनीच बांधणी साड्यांना प्राधान्य दिले होते. मात्र 60 व्या वर्षीही नीता अंबानी यांच्या सौंदर्याने सर्वांवर मात केली. नीता अंबानी यांनी यावेळी सब्यासाचीने डिझाईन केलेली बांधणी साडी नेसली होती. कसा होता नीता अंबानी यांचा लुक पाहूया (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
रॉयल बांधणी साडी
पारंपरिक गुजराती बांधणी साडी
नीता कोणत्याही कार्यक्रमात आपल्या लुक्सने लोकांचे लक्ष वेधून घेण्यात कधीही अपयशी ठरत नाही आणि यावेळीही त्यांच्या लुकमुळे त्या चर्चेत राहिल्या आहेत. अनंत आणि राधिकाच्या मामेरू सोहळ्यातही नीता अंबांनींचा सुंदर लुक पाहायला मिळाला होता. या फंक्शनसाठी सोनेरी जरी वर्क असलेली गुलाबी रंगाची बांधणी साडी त्यांनी नेसली होती.
पारंपरिक पद्धतीने नेसली साडी
काय आहेत साडीची वैशिष्ट्ये
नीता अंबानी यांनी गुजराती पारंपारिक शैलीत साडीचा पदर पुढच्या बाजूला स्टाईल केला होता. गुलाबी आणि गोल्डन जरी वर्क असणारी ही साडी खूपच सुंदर आणि आकर्षक दिसून येत होती. गुलाबी, सोनेरी आणि केशरी रंगाचा ओम्ब्रे ब्लाउज घातला होता. हा लुक परफेक्ट गुजराती लुक देत होता.
डायमंड पाचूचा नेकलेस
हिऱ्यांमध्ये जडलेल्या पाचूचा नेकपिस
लुक पूर्ण करण्यासाठी नीता अंबानी यांनी मोठे पाचू जडवलेला डायमंड नेकपीस घातला होता. शिवाय, त्यांनी यासह मॅचिंग कानातले आणि दोन डायमंडच्या बांगड्या घातल्या होत्या. नेहमीप्रमाणेच हिरे आणि पाचूंनी सजूनधजून नीता अंबानी यांनी आपला हा लुक पूर्ण केला होता.
वेव्ही हेअरस्टाईल
साडीवरील परफेक्ट हेअरस्टाईल
या संपूर्ण लुकसह हेअरस्टाईल करताना केस मोकळे ठेवले होते. तर नीता अंबानींची ही हेअरस्टाईल वेव्ही केल्यामुळे अधिक आकर्षक दिसत होती आणि त्यांच्या बांधणी साडीसह परफेक्ट मॅचदेखील होताना दिसत आहे.
सटल मेकअप
सुंदर आणि आकर्षक मेकअप
नीता अंबानी यांचा मेकअप नेहमीच प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टर करतात आणि यावेळीदेखील अत्यंत सटल आणि आकर्षक असा मेकअप करण्यात आला होता. दाट भुवया, आयलायनर, काजळ, मेकअप बेस, हायलायटर, डार्क आयशॅडो आणि गुलाबी रंगाची हलकीशी लिपस्टिक लावत हा लुक पूर्ण केलाय.