(फोटो सौजन्य: Pinterest)
हिवाळा ऋतू आता सुरु होण्याच्या वाटेवर आहे. या सणात अनेक हंगामी भाज्या आणि फळे बाजारात उपलब्ध होऊ लागतात. यांची खासियत म्हणजे या भाज्या आणि फळे फक्त या सीजनमध्येच उपलब्ध होतात, तसेच ते आरोग्याला अनेक फायदे मिळवून देतात. थंडीमध्ये अनेक किरकोळ आजार जन्म घेतात ज्यामुळे आपल्या आहाराकडे वशेष लक्ष द्यायला हवे. थंडीमध्ये फुफ्फुसांचे कार्य कमी होते. पण काळजी करण्याची गरज नाही कारण नुकतेच फुफ्फुसांचे आरोग्य राखण्यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधनातून काही फळांचे सेवन फायद्याचे असल्याचे स्पष्ट केले आहे. न्यूट्रिशनिस्ट लिमा महाजन यांनी सांगितले की, प्रदूषणाच्या संपर्कात येण्यामुळे शरीरात ऑक्सिडेटिव्ह ताण वाढतो. हे मुक्त रॅडिकल्स फुफ्फुसांच्या पेशींना नुकसान पोहोचवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात. यामुळे निरोगी लोकांच्या श्वसनमार्गालाही हानी पोहोचू शकते.
संशोधनातून हे स्पष्ट करण्यात आले आहे की, जे जास्त भाज्या आणि फळे खातात त्यांना PM2.5 सारख्या प्रदूषणातही फुफ्फुसांच्या क्षमतेत लक्षणीय घट जाणवत नाही. निरोगी आहार आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे यातून अधोरेखित होते. युरोपियन रेस्पिरेटरी सोसायटी काँग्रेसमध्ये सादर केलेल्या २०२५ च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, चार किंवा त्याहून अधिक फळांचे सेवन करणाऱ्या महिलांचे आरोग्य कमी फळांचे सेवन करणाऱ्या महिलांच्या तुलनेत अधिक चांगले असते. लिमा महाजन यांनी अशा काही फळांची नावे शेअर केली आहेत, ज्यांचे सेवन करुन तुम्ही तुमच्या फुफ्फुसांचे आरोग्य सुधारु शकता.
सफरचंद
एक सफरचंद खा आणि डाॅक्टरांना पळवा ही म्हण तर तुम्ही अनेकदा ऐकली असेल. सफरचंद हे एक आरोग्यदायी फळ आहे, ज्याचे हिवाळ्यात आवर्जून सेवन करायला हवे. याचे सेवन फुफ्फुसातील जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत करते.
पेरु
पेरु अनेकांच्या आवडीचे फळ आहे, तुम्ही रोजच्या आहारात याचे सेवन करु शकता. यामुळे प्रदूषणामुळे होणारे मुक्त रॅडिकल्स कमी होतात आणि फुफ्फुसांचे आरोग्य बनून राहते.
संत्री
संत्री फळात अनेक अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात जे श्वसनमार्गाचे संरक्षण करण्यास मदत करते. हिवाळ्यात बाजारात मोठ्या प्रमाणात संत्री उपलब्ध होते.
डाळिंब
लालचुटुक डाळींब रोज खाल्ल्याने शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुधारतो आणि पेशींच्या दुरुस्तीस मदत होते. तुम्ही सॅलड अथवा फ्रुट कस्टर्डमध्ये याचा समावेश करु शकता.
आवळा
नेहमीच बाजारात उपलब्ध असणाऱ्या आवळ्यासोबत लहानपणीच्या आठवणी जोडलेल्या आहेत. यातील पोषक घटक सर्दी आणि प्रदूषणाचा ऑक्सिडेटिव्ह ताण फुफ्फुसांवर हल्ला करण्यापासून रोखते.
बेरी
बेरीडचे सेवन शरीरातील कोणत्याही प्रकारची जळजळ कमी करण्यास मदत करतात.
पपई
आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यास पपई मदत करते. याचे सेवन शरीरातील हानीकारक घटक बाहेर काढून टाकण्यास मदत करते. यामुळे आतडे विषमुक्त राहतात. तसेच श्वसनाचे कार्यही यामुळे सुधारते.
हिवाळ्यात फुफ्फुसांचे आरोग्य कसे राखायचे?
उबदार राहा, चांगला श्वास घ्या, घरातील हवेची गुणवत्ता राखा, वायू प्रदूषणापासून सावध रहा, धूम्रपान आणि त्रासदायक पदार्थ टाळा, हायड्रेटेड रहा.
थंड हवामानात फुफ्फुसांचे काय होते?
थंड हवेमुळे तुमचे वायुमार्ग अरुंद होऊ शकतात. यामुळे तुमच्यातील श्लेष्माचे प्रमाण वाढू शकते आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






