प्यार कोई खेल नहीं हे गाणं तुम्ही ऐकलं असेलच. खरंय प्रेम (Love) हा खेळ असू शकत नाही पण तो शारिरिक संबध (Physical Relation) हा खेळ आहे. असं म्हण्टलं तर तुम्हाला वेड्यात काढणारे अनेक मिळतील. मात्र, हे खरं आहे. सेक्सला (S-e-x) आता खेळाचा दर्जा (Sports) देण्यात आल आहे, आणि ही अजब गोष्ट घडलीये स्वीडनमध्ये. स्वीडनमध्ये आता सेक्सला एक खेळ म्हणून मान्यता मिळाली आहे. स्वीडन हा खेळ म्हणून लैंगिकतेची नोंदणी करणारा पहिला देश ठरला आहे. तसेच, येत्या 8 जूनला स्वीडनमध्ये पहिली ‘युरोपियन सेक्स चॅम्पियनशिप’ (sex championship 2023 sweden)आयोजीत करण्यात आली आहे.
[read_also content=”‘या’ कारणामुळे झाला ओडिशातील भीषण रेल्वे अपघात, संयुक्त तपास अहवालात धक्कादायक माहिती आली समोर https://www.navarashtra.com/india/the-reason-behind-odisha-train-accident-is-revealed-in-accident-joint-investigation-report-nrps-409275.html”]
स्वीडनमध्ये नुकतचं शारीरिक संबंधांना खेळ म्हणून मान्यता देण्यातआली आहे. ८ जूनला ही स्पर्धा पार पडणार आहे. स्वीडिश सेक्स फेडरेशन यांनी ही स्पर्धा आयोजीत केली आहे. ृया स्पर्धेमध्ये स्पर्धकांना दररोज सहा तास स्पर्धा करावी लागणार आहे. सहभागी स्पर्धकांना सामने किंवा अॅक्टिव्हिटीजसाठी अंदाजे ४५ मिनिटं ते एक तास वेळ दिला जाणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत विविध देशांतील 20 स्पर्धकांनी युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपसाठी अर्ज केले आहेत. अंतिम मूल्यांकनादरम्यान, प्रेक्षकांच्या 70% मतांचा विचार केला जाईल, तर उर्वरित 30% न्यायाधीशांच्या मतांवर अवलंबून असेल.
नातेसंबंधात शारीरिक संबंध खूप महत्त्वाचे असतात. जेव्हा आपण नात्यात एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा नात्यात शारीरिक आकर्षण वाढते. परस्पर प्रेम टिकवण्यासाठी सेक्स खूप महत्त्वाचा असतो. सेक्सला खेळ म्हणून मान्यता दिल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्याला चालना मिळेल, असं मत स्वीडिश फेडरेशन ऑफ सेक्सचे अध्यक्ष ड्रॅगन ब्रॅटिच यांनी म्हटलंय.
शारिरिक संबधाचे अनेक फायदे आहेत. शारिरिक संबधामुळे फक्त दोन शरीर जवळ येत नाही तर मन देखील एकत्र येतात. जोडीदारांमध्ये भावनिक संबंध स्थापन करण्यासाठी सेक्स महत्त्वाची भूमिका पार पाडते. सेक्स दरम्यान मेंदूतील रसायने सोडली जातात, ज्यामुळे चिडचिड आणि नैराश्याची भावना कमी होते. त्याचप्रमाणे शांतता निर्माण होते.
सेक्समुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की जे पुरुष आठवड्यातून दोनदा जास्त सेक्स करतात त्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी असतो.
बर्याच अभ्यासातून असे दिसून आले आहे की सेक्स केल्याने तुमचा मूड सुधारतो, परंतु एका अभ्यासाने हे देखील सिद्ध केले आहे की जे लोक नियमितपणे सेक्स करतात ते तणाव अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतात.