या पदार्थांवर लिंबू पिळून खाल्यास होऊ शकते आरोग्याचे नुकसान
सर्वच ऋतूंमध्ये बाजारात लिंबू उपलब्ध असतात. लिंबाचा वापर जेवणातील अनेक पदार्थांमध्ये केला जातो. लिंबामध्ये आरोग्यसाठी गुणकारी असलेले पदार्थ आढळून येतात. यामध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळून येतात. चवीला आंबट असलेले हे फळ आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. लिंबाचा रस आरोग्यसोबतच त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे. यामध्ये असलेले विटामिन सी गुणधर्म त्वचेचा रंग उजळ्वण्यासाठी मदत करते. पण अनेकदा आपण इतर पदार्थांमध्ये लिंबू पिळून खातो. यामुळे आरोग्यसंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला कोणत्या पदार्थांमध्ये लिंबू पिळून खाऊ नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. लिंबू पिळून खाल्ल्याने आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात.(फोटो सौजन्य-istock)
या पदार्थांवर लिंबू पिळून खाल्यास होऊ शकते आरोग्याचे नुकसान
लिंबामध्ये सायट्रिक असिड आढळून येते. त्यामुळे दुधात जर लिंबू पिळला तर त्याचे दही तयार होते. यामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पोटदुखी, अपचन होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांमध्ये लिंबू पिळू नये. असे केल्यास फूड इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
या पदार्थांवर लिंबू पिळून खाल्यास होऊ शकते आरोग्याचे नुकसान
मसालेदार पदार्थ बनवल्यानंतर काहीजण त्यात लिंबाचा रस टाकतात. असे केल्याने पदार्थाची चव पूर्णपणे खराब होऊन जाते. लिंबू हे आम्लयुक्त असल्याने पदार्थांमध्ये उष्णतेची वाढ होते. तयार केलेला पदार्थ लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे मसालेदार किंवा तिखट पदार्थ बनवल्यानंतर त्यात लिंबू पिळू नये.
या पदार्थांवर लिंबू पिळून खाल्यास होऊ शकते आरोग्याचे नुकसान
काही घरांमध्ये फळांचे सॅलड किंवा नुसतीच फळे खाताना त्यावर लिंबू पिळला जातो. पण असे केल्याने फळांमधील गुणधर्म निघून जातात. फळांची चव खराब होऊन जाते. लिंबू पिळून फळे खाण्याची पद्धत चुकीची आहे. आंबा, स्ट्रॉबेरी आणि खरबूज ही फळे खात असताना लिंबाचा वापर करू नये.
या पदार्थांवर लिंबू पिळून खाल्यास होऊ शकते आरोग्याचे नुकसान
टोमॅटोमध्ये लिंबू पिळून खाल्यास टोमॅटोची चव पूर्णपणे खराब होऊन जाते. सॅलॅड बनवताना अनेक जण लिंबाच्या रसाचा वापर करतात. पण असे करू नये. त्यामुळे पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतात. पचनसंथा बिघडण्याची शक्यता असते. अपचन गॅस, असिडिटी इत्यादी समस्या उद्भवतात.