(फोटो सौजन्य – Pinterest)
उन्हाळ्याचा ऋतू अखेर सुरु झाला आहे. यादिवसांत घराबाहेर पडताच कडक उन्हाचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात आपल्या शरीराला हायड्रेट ठेवणे फार महत्त्वाचे असते. अनेकांना यादिवसांत आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवते ज्यामुळे थकवा, चक्कर येणे अशा समस्या उद्भवतात. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही समर ड्रिंक्सचा समावेश करू शकता.
5 मिनिटांतच तयार होईल कांद्याची ही स्पेशल भाजी; त्वरित नोट करा रेसिपी
उन्हाळ्यातील सुखद धक्का म्हणजे रसाळ आंबा. या ऋतूला आंब्यांचा सीजन असेही म्हटले जाते. अशात तुम्ही आंब्यांपासूनच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स तयार करू शकता. उन्हाळ्यात आंबा खाण्याचे खूप फायदे आहेत. त्यात अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. जे तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवते. त्यात पोटॅशियम, प्रथिने, मॅग्नेशियम सारखे पोषक घटक आढळतात. जर तुम्ही आंबा प्रेमी असाल तर आज आम्ही तुम्हाला आंब्यापासून तयार होणाऱ्या काही खास आणि रुचकर अशा पेयांविषयी माहिती सांगत आहोत. हे मँगो ड्रिंक्स तुमच्या शरीराला कडक उन्हापासून हायड्रेट करण्यास मदत करतील आणि शरीराला थंडावा देतील.
मँगो लस्सी
देशातील लोकप्रिय पेयांपैकी मँगो लस्सी एक आहे. उन्हाळ्यात हे पेय फार ट्रेंडमध्ये असते. यासाठी ब्लेंडरमध्ये, पिकलेल्या आंब्याचा गर, दही, साखर आणि चिमूटभर वेलची पावडर घाला आणि चांगले मिसळा. आता त्यात चिरलेला सुकामेवा घाला. तुम्ही ही लस्सी काहीवेळ फ्रीमध्ये ठेवून याचा थंडगार आस्वाद घेऊ शकता.
मँगो मोजिटो
अनेकांना माहिती नसेल पण आंब्यापासून तुम्ही मँगो मोजिटो हे पेय देखील तयार करू शकता. हे करण्यासाठी, प्रथम पुदिन्याच्या पानांचा रस तयार करा. आता त्यात आंब्याचा रस, सोडा पाणी आणि बर्फ घाला. चवीला हे फार रिफ्रेशिंग वाटते.
मँगो ज्यूस
काही साधे सोपे हवे असेल तर तुम्ही उन्हाळ्यात तुम्ही थंड आंब्याच्या रसाचा आनंद देखील घेऊ शकता. यासाठी, आंब्याचे चौकोनी तुकडे करा. आता ते मिक्सरमध्ये टाका आणि चांगले मिसळा. आता या पेस्टमध्ये पाणी घालून पातळ करा. मग यात लिंबाचा रस आणि साखर घाला आणि चांगले एकत्रित मिसळा. तुमचा आंब्याचा रस तयार आहे. तुम्ही लिंबाचा रस स्किप करू शकता.
चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पॅटीस पाव, वाचा रेसिपी
मँगो शिकंजी
चवीला चटपटीत आणि रिफ्रेशिंग अशी मँगो शिकंजी एकदा तरी उन्हाळ्यात नक्की बनवून पहा. यासाठी थंड पाण्यात काळे मीठ, जिरे पावडर, चाट मसाला पावडर, काळी मिरी पावडर आणि लिंबाचा रस घाला. आता त्यात आंब्याचा लगदा घाला. हे मिश्रण चांगले मिसळा. तुमची मँगो शिकंजी तयार आहे.