त्वचेचा कर्करोग झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे
जगभरात लाखो रुग्ण कर्करोगासारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. कर्करोग झालेली व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पूर्णपणे खचून जाते. हा एक गंभीर आजार आहे. कर्करोग झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र हळूहळू कर्करोगाची लक्षणे दिसू लागतात. त्वचेचा कर्करोग झाल्यानंतर त्यांची लक्षणे ओळखणे अतिशय कठीण होऊन जाते. कारण त्वचेवर अनेकदा लहान मोठे पिंपल्स किंवा जखमा होतात. मात्र कालांतराने त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे तीव्र झाल्यानंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
त्वचेचा कर्करोग झाल्यानंतर कान आणि डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असते. शरीराच्या कोणत्याही भागावर कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हला त्वचेचा कर्करोग झाल्यानंतर शरीरामध्ये कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
त्वचेचा कर्करोग झाल्यानंतर त्वचेमध्ये जळजळ किंवा खाज सुटण्यास सुरुवात होते. बेसल सेल कार्सिनोमा, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि मेलेनोमा यांसारखे त्वचेचे कर्करोग अतिशय घातक आहेत. यामुळे त्वचेवर पुरळ येणे, जखमा होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. मर्केल सेल कार्सिनोमा कर्करोगात लाल रंगाचे मस्से त्वचेवर किंवा शरीरावर वाढू लागतात. हा कर्करोग त्वचेच्या कोणत्याही भागांवर होण्याची शक्यता असते. कारण त्यांना सूर्यचा प्रकाश थेट मिळतो.
त्वचेवर झालेल्या जखमा लवकर बऱ्या न झाल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. अन्यथा ही छोटी समस्या मोठी होण्याची शक्यता असते. बेसल सेल कार्सिनोमा आणि स्क्वॅमस सेल कार्सिनोमा यांसारखे त्वचेवर होणारे कर्करोग वेगाने त्वचेवर पसरतात. याशिवाय त्वचेची काळजी न घेतल्यास हा आजार आणखीन गंभीर होण्याची शक्यता असते.
त्वचेचा कर्करोग होऊ नये म्हणून त्वचेची योग्य काळजी घ्यावी. सूर्यप्रकाशात कमी कमी वेळ घालवणे गरजेचे आहे. उन्हामध्ये जास्त वेळ बाहेर जाण्याची वेळ आल्यास सावली असलेल्या ठिकाणी जाऊन उभे राहावे. बाहेर उन्हामध्ये फिरताना लांब हात असलेला शर्ट, टीशर्ट, पँट परिधान करावी. ज्यामुळे त्वचेवर नुकसान होणार नाही. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी बाहेर जाताना योग्य काळजी घ्यावी.