वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे करावे आणि करू नये
शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे धावपळीच्या जीवनशैलीतून वेळ काढत आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून यतो. चुकीच्या आहारामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर पिवळ्या रंगाचा चिकट थर रक्तवाहिन्यांमध्ये तसाच साचून राहतो. ज्यामुळे इतर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी आरोग्याची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – iStock)
पोटावर साचून राहिलेला चरबीचा थर कमी करण्यासाठी मधात मिक्स करून खा ‘हा’ तिखट पदार्थ
रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल साचून राहिल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्या आणि संपूर्ण शरीराच्या रक्तवाहिन्या काहीवेळा ब्लॉक होण्याची शक्यता असते. यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढू लागतो. त्यामणुळे रक्तात साचून राहिलेले अतिरिक्त कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी आहारात तेलकट किंवा अतितिखट पदार्थांचे सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे करावे आणि करू नये? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चाल तर जाणून घेऊया.
शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे तेलकट पदार्थांचे सेवन करू नये. तेलकट पदार्थांमध्ये असलेले अतिरिक्त तेल रक्तामध्ये सर्बीचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे जेवणाच्या ताटात नेहमी कमी साखरेचे आणि पचनास हलके वासनेने पदार्थ खावेत. तेलकट अन्नपदार्थ खाल्यामुळे रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाटू लागते.
ऑलिव्ह ऑईल आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या तेलात असलेले गुणधर्म आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. त्यामुळे जास्त कोलेस्टरलची पातळी वाढलेल्या लोकांनी आहारात ऑलिव्ह ऑईलचा वापर करावा. या तेलात बनवलेले पदार्थ पदार्थ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. यामध्ये हेल्दी फॅट्स असतात, ज्यामुळे वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते.
आरोग्य सुधारण्यासाठी आहारात सुका मेवा खाल्ला जाते. यामुळे शरीराची ताकद आणि ऊर्जा वाढण्यास मदत होते. आहारात बदाम, काजू, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, खरबूज बिया, चिया सीड्स इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणत राहते. कोलेस्टरॉलने त्रस्त असलेल्या लोकांनी नियमित काजूचे सेवन करावे.
कोलेस्ट्रॉलच्या रूग्णांनी करू नका 4 तेलांचे सेवन, हृदयांच्या नसांमध्ये त्वरीत भरेल रक्त
दैनंदिन आरोग्य निरोगी जगण्यासाठी आहारात फळे, भाज्या, हिरव्या भाज्या इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. फळांमध्ये असलेली साखर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. फळे आणि भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे शरीराचे कोलेस्ट्रॉल कमी होऊन जाते.