आपल्यापैकी बहुतेकांना 17 ते 21 वर्षे वयात अक्कलदाढ येते. हा अनुभव इतर दातांच्या तुलनेत अतिवेदनादायी असतो. अनेकांना वयाच्या पंचवीशीनंतरही अक्कलदाढ येते. हे दात खूप मजबूत असतात. त्यामुळे ते येण्यास खूप उशीर होतो. आपल्या जबड्यामध्ये 28 दात असतात आणि संपूर्ण जबड्यात हे दात आपली जागा व्यापून घेतात; पण अक्कल दाढा मात्र खूप उशिरा येतात. त्यामुळे जबड्यात त्यांना येण्यास जागा राहिलेली नसते, त्यामुळेच अक्कलदाढ येताना खूप वेदना होतात. त्याचबरोबर हिरड्यांवर दाब येतो. त्यामुळेच दातात वेदना, हिरड्या सुजतात आणि वेदना होतात. ही नैसर्गिक प्रक्रिया असते ती प्रत्येकाबरोबर होतेच. अक्कल दाढेच्या वेदना कधीही होऊ शकतात. एक दोन दिवस या वेदना होत राहतात(Terrible pain that comes when you have a wisdom toothache Home remedies and remedies Get relief quickly).
दाताच्या वेदनांसाठी बहुतेक लोक लवंगांचा वापर करतात. लवंग दातामध्ये दाबून धरल्यास वेदना कमी होण्यास मदत होते. लवंगेत अॅनस्थेटिक आणि अॅनलगेसिक गुण असतात, त्यामुळे वेदना दूर होण्यास मदत होते. दिवसातून दोन तीनवेळा लवंग दाताखाली धरावी आणि त्या दरम्यान काही खाऊ नये.
मिठाचा वापर केल्यास फायदा होतो. वेदना दूर करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. ते पाणी तोंडात धरून शेकवा. दातामध्ये होणारा संसर्ग दूर होतो आणि वेदनांपासून मुक्तता मिळते. सकाळी दात घासताना देखील मिठाच्या पाण्याचा वापर करावा.
यामध्ये जीवाणूप्रतिरोधक गुण असतात, शिवाय त्यात प्रतिजैविक, दाह कमी करण्याचे आणि इतर औषधी गुण असतात. त्यामुळे अक्कल दाढ येतानाच्या वेदना कमी होतात. लसूण सोलून त्याच्या पाकळ्या लावल्या तर दातांच्या वेदनेत आराम मिळतो. दिवसातून दोनवेळा दोन दोन लसणाच्या पाकळ्या चावून खाल्ल्यास दाताच्या वेदना कमी होतात.
हिंगामध्ये अनेक आयुर्वेदिक गुण आहेत. त्यात दाह कमी करणारे, अँटिसेप्टिक गुण असतात त्यामुळे दातांच्या वेदनांपासून मुक्ती मिळते. अगदी थोडा हिंग घेऊन तो दातांला होणार्या वेदनांच्या जागी लावावा किंवा एक चतुर्थांश पाण्यात हिंग मिसळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
दाताच्या वेदनांसाठी कांदा जादूगार आहे. त्याच्या वापराने दाताच्या वेदनांपासून आराम मिळेल. कांदा कच्चा खाल्ल्यास दातांच्या वेदनांपासून आराम मिळतो; पण दातांना होणाऱ्या वेदनांमुळे कांदा कच्चा खाऊ शकत नसाल तर त्याच रस काढून लावावा.
पेरूची कोवळी पाने तोडून स्वच्छ धुवून घ्या आणि दुखणाऱ्या दाताखाली ती पाने दाबावीत. त्यामुळे दाताच्या वेदना कमी होतात. दर दिवशी चारवेळा ही पाने चावल्यास खूप आराम मिळतो. शक्य असल्यास ही पाने एक कप पाण्यात उकळून त्या पाण्याने माऊथवॉश सारख्या गुळणा कराव्यात.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]






