(फोटो सौजन्य – Pinterest)
भारतात अनेक सुंदर आणि ऐतिहासिक वस्तू आहेत ज्यांना पाहण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक भारतात येत असतात. भारताची निसर्गसौंदर्य आणि सांस्कृतिक संपत्ती जगभर प्रसिद्ध आहे. इथे डोंगरदऱ्या, समुद्रकिनारे, जंगलं आणि अनेक ऐतिहासिक स्थळं पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र, भारतात काही गुफा देखील आहेत ज्या केवळ भौगोलिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टीनेही फार महत्त्वाच्या आहेत. आज आम्ही तुम्हाला देशातील आहे काही गुफांविषयी माहिती सांगणार आहोत ज्या आजची भारताच्या इतिहास प्रतिबिंबित करतात.
जेव्हा भारतातील गुफांची चर्चा होते, तेव्हा बहुतेकदा अजंता, एलोरा किंवा एलीफेंटा या गुहांचीच नावे घेतली जातात. पण भारतात अशा अनेक गुफा आहेत ज्या अनोख्या शिल्पकलेसाठी आणि धार्मिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहेत. काही गुफा प्राचीन चित्रकला आणि कोरीवकामासाठी ओळखल्या जातात, तर काही गुफा नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या स्टॅलेक्टाइट्स आणि स्टॅलेग्माइट्ससाठी प्रसिद्ध आहेत. यातील अनेक गुहांना UNESCO च्या जागतिक वारसा यादीत स्था देखील विशेष स्थान देण्यात आले आहे. या गुफा देशाच्या केवळ ऐतिहासिक वास्तू नाहीत तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जिवंत स्मारक आहेत.
अजंता गुफा, महाराष्ट्र
महाराष्ट्रातील अजंता गुफा देशभर लोकप्रिय आहे, दूरदूरवरून पर्यटक या गुहा पाहण्यसाठी येत असतात. महाराष्ट्रातील औरंगाबादजवळ वसलेल्या अजंता गुहा बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. येथे एकूण ३० गुहा असून, त्यामध्ये भगवान बुद्धांचे जीवनदर्शन करणाऱ्या भित्तीचित्रांची आणि मूर्तिकलेची झलक पाहायला मिळते. या गुफांना UNESCO ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत विशेष स्थान देण्यात आले आहे.
एलोरा गुफा , महाराष्ट्र
औरंगाबादजवळच एलोरा गुफा देखील स्थापित आहेत. येथे हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माचे संगम रूप पाहायला मिळते. येथे असलेले कैलास मंदिर हे एका अखंड दगडामधून कोरलेले अद्भुत वास्तुशिल्प आहे. या गुफा ६व्या ते १०व्या शतकादरम्यान तयार करण्यात आल्या आहेत. तुम्ही एकाच दिवशी अजंता आणि एलोरा अशा दोन्ही गुहा पाहू शकता.
एलीफेंटा गुफा, मुंबई
मुंबईजवळील एलीफेंटा बेटावर असलेल्या या गुफा जगभर प्रसिद्ध आहेत. या गुहा भगवान शिवाला समर्पित असल्याचे सांगितले जाते. येथे असलेली “त्रिमूर्ती” ही पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे. या गुफांनाही UNESCO चा जागतिक वारसा दर्जा प्राप्त आहे.
Cat Lovers साठी कोणत्या स्वर्गाहून कमी नाही हे आयलँड; इथे माणसांहून अधिक आहे मांजरांचे वास्तव
बोर्रा गुफा, आंध्र प्रदेश
विशाखापट्टणमजवळ अराकू खोऱ्यात असलेल्या या गुफा नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या असून, चुना दगडांमधून निर्माण झालेल्या आहेत. या गुफा निसर्गप्रेमींसाठी खास आकर्षण ठरतात. तुमच्या कुटुंबासह तुम्ही यांचे अद्भुत सौंदर्य पाहण्यासाठी या गुहांना भेट देऊ शकता.
बाघ गुफा, मध्य प्रदेश
धार जिल्ह्यात असलेल्या बाघ गुफा बौद्ध धर्माशी संबंधित असून, त्यांच्या भिंतींवरील चित्रकाम अतिशय सुंदर आहे. या गुफादेखील खडकात कोरून तयार करण्यात आल्या आहेत. येथे प्राचीन बौद्ध विहारांचे अनेक अवशेष पाहायला मिळतात.
अमरनाथ गुफा, जम्मू आणि काश्मीर
धार्मिक दृष्टिकोनातून अमरनाथ गुहा फार महत्त्वाची मानली जाते. दरवर्षी हजारो भाविक अमरनाथ यात्रेदरम्यान या गुहेत बर्फाने तयार होणाऱ्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येथे जात असतात. ही गुफा निसर्गाचा एक अद्वितीय चमत्कार मानला जातो. जम्मू काश्मीरला कधी फिरायला गेलात तर या गुहेला आवर्जून भेट द्या.