सासू सून वादाची पहिली ठिणगी! घरातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून फॉलो करा 'या' टिप्स
प्रत्येक घरात कोणत्या ना कोणत्या लहान मोठ्या कारणांवरून वादविवाद होत असतात. कोणत्या कोणत्या गोष्टींवर भांड्याला भांडं लागतच. पण काहीवेळा ही भांडण टोकाला पोहचतात, ज्यामुळे नातेसंबधं खराब होतात. घरातील नात्यांमध्ये कटुता निर्माण होते. आपल्याच घरातील माणसं आपल्यासोबतच का वाईट वागतात? असे असंख्य प्रश्न कायमच मनात निर्माण होतात. नात्यांमध्ये सगळ्यात जास्त भांडण ही सासू सुनेची होतात. कधी जेवणांवरून तर कधी घरातील भांडी घासण्यावरून वाद वाढतात. पण हे वाद तेवढ्या पुरते न राहता विकोपाला जातात आणि घरातील परिस्थिती हाताबाहेर जाते. सासू – सून वाद हा वर्षानुवर्ष परंपरागत चालत आलेली आहेत. लग्न झाल्यानंतर बरेचदा मुलं आपल्या बायकोसह वेगळे राहायला जातात, तर काही घरांमध्ये सासू सून एकत्र राहून सुद्धा खूप जास्त वाद निर्माण होतात.(फोटो सौजन्य – istock)
सतत भांडणं होऊन Relation तुटण्याची आहे भीती? 5 टिप्स वापरून तर पाहा
काहीवेळा सासू सुनेचा अपमान करते तर काहीवेळा सून सासूचा अपमान करते. तसेच अनेक घरांमध्ये सासू नात्याचा गैरवापर करत अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुनेशी वागते. तर सून तिच्या विरोधात केलेल्या शोषणावर बोलण्याची हिंमत दाखवते. पण नात्यांमधील प्रेम आणि आपुलकी कायम टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही बाजूने नातं जपणं फार गरजेचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सासू सुनेमधील कौटुंबिक वाद विकोपाला जाऊ नये, म्हणून कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात.
सासू सुनेच्या भांडणाची पहिली ठिणगी कायमच स्वयंपाक घरात पडते आणि त्यानंतर सुरु होते महाभारत. प्रत्येक घरात जेवण बनवण्या वरून किंवा घरातील इतर कारणांवरून काहींना काही भांडण होत असतात. सासू सुनेची भांडण आता कॉमन झाली आहेत. सगळ्यांच्या घरी हा गैरसमज कधीना कधी होत असतो. सासू सुनेची भांडण होऊ नये म्हणून सासूने सुद्धा समजून घेणे फार महत्वाचे आहे. सुनेला किचनचा अधिकार नको असतो, पण घरातील सगळ्यांना काहींना काही नवीन पदार्थ बनवून खाऊ घालण्याची इच्छा असते. तसेच सुनेने सुद्धा थोडं धीरानं घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सासू सुनेच्या भांडणावरील उपाय म्हणजे दोघींनी सुद्धा एकमेकांना समजून घेणे खूप जास्त महत्वाचे आहे.
Relationship Tips: परफेक्ट बायको होण्यासाठी सोप्या टिप्स; देवी …
किचन खरंतर दोघींचं आहे. दोघीनी एकमेकांना समजून घेऊन काम केलं तर कदाचित छोट्या मोठ्या कुरबुरी होतील पण वाद होणार नाहीत. सासू सुनेचे नाते मैत्रीपूर्ण आणि आई मुलीचे असेल तर नात्यांमध्ये कधीच कटुता येत नाही. घरात वाद होण्याऐवजी घरातील वातावरणात कायमच आनंदी आणि उत्साहाचे राहते. नात्यांमध्ये वाढलेले मतभेद वेळीच सोडविल्यास आयुष्यात कसलाही त्रास होणार नाही.






