फोटो सौजन्य - Social Media
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दररोज काही वेगळंच पाहायला मिळत आहे. वळणं, वळणं… किती ते वळणं? यंदाचा खेळ पूर्ण वळणांनी भरला आहे. अनुश्री आणि तन्वीमध्ये वाद झालेला दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच अनुश्रीने टोळी सोडली, पण बिग बॉसने सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये ते सगळं एक नाटक होतं का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नक्की काय आहे Promo मध्ये?
अनुश्री गेम चेंजर ठरली असल्याची दिसून येत आहे. अनुश्री माने आणि तन्वी कोलते यामध्ये संग्राम झाल्याचे दिसून येते. तन्वी म्हणते की अनुश्री टोळी सोडण्याच्या दोन आठवड्यांआधीपासून आम्हाला त्याबद्दल सांगत होती. तेव्हा अनुश्री म्हणते की टोळी सोडणे हा माझा आणि विशालचा प्लॅन होता. तेव्हा विशाल सैतानी हास्य देतो. तेव्हा रागात येऊन तन्वी म्हणते की “अनुश्री, तू विश्वास ठेवण्याच्या मुळीच लायकीची नाहीस!” तेव्हा अनुश्री म्हणते की, “मी Individual खेळते, दादा-दादा नाही करत बसत! तू लायकी कुणाची काढतेस.”
हा वाद मोठ्या प्रमाणात पेटलेला दिसून आला आहे. प्रेक्षकांना अनुश्रीचा हा खेळ आवडत असल्याचे दिसून येत आहे. खेळ म्हणून अनुश्रीने जे केलं ते योग्य आहे असे काही प्रेक्षकांचे म्हणणे आहे, तर काही काटाचे चाहते आहेत, त्यांनी अनुश्रीच्या या कृत्याबद्दल खंत व्यक्त करत तन्वीची बाजू घेतली आहे. परंतु, बिग बॉस हा खेळ आहे आणि खेळात डावपेच नसतील तर तो खेळ कसला? त्यामुळे अनेक प्रेक्षक या मटावरुन अनुश्रीची बाजू घेत आहेत.
काय म्हणतंय दुसरं प्रोमो?
बिग बॉसने सोशल मीडियावर आणखीन एक प्रोमो शेअर केला आहे. या Promo मध्ये राखीने विशालच्या अंगावर पाणी ओतल्याचे दिसून येत आहे त्यामुळे दोघांमध्ये मोठा राडा झाल्याचे दिसून येत आहे.






