• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • The Silent Signs Of Prostate Trouble You Shouldn T Ignore

पुरूषांनो सावधान! Prostate बाबत असणारे Silent Signs करू नका दुर्लक्षित, जाईल जीव

पुरुषांमध्ये सर्वाधिक होणारा त्रास हा प्रोस्टेटचा असून याकडे अनेकदा त्रास दुर्लक्षित केला जातो. सध्या पुरुषांना याबाबत जाणून घेण्याची गरज आहे. तज्ज्ञांनी याबाबत अधिक खुलासा केला आहे, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 29, 2025 | 12:25 PM
प्रोस्टेट समस्या नक्की काय आहे (फोटो सौजन्य - iStock)

प्रोस्टेट समस्या नक्की काय आहे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • प्रोस्टेट समस्या काय आहे 
  • पुरुषांना काय होतो त्रास 
  • तज्ज्ञांचा सल्ला 
प्रोस्टेट ही पुरुषांमध्ये असलेली एक लहान, अक्रोडाच्या आकाराची ग्रंथी आहे जी मूत्राशयाच्या खाली आणि मूत्रमार्गाभोवती असते. ही ग्रंथी प्रजनन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते कारण ती वीर्यातील द्रवाचा एक भाग तयार करते. स्नायुमय रचनेमुळे प्रोस्टेट स्खलनास (ejaculation) मदत करते, मूत्रमार्गाला आधार देते आणि लघवीच्या नियंत्रणातही भूमिका बजावते.

वय वाढल्यावर प्रोस्टेटचा आकार वाढण्याची शक्यता असते, आणि त्यामुळे काही आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. या समस्या वयानुसार ग्रंथीच्या वाढीमुळे (benign prostatic hyperplasia), संसर्गामुळे किंवा प्रोस्टेट कॅन्सरमुळे होऊ शकतात. डॉ. शीतल मुंडे, डॉक्टर इन्चार्ज आणि कन्सल्टंट – हिस्टोपॅथॉलॉजिस्ट, ग्लोबल रेफरन्स लॅबोरेटरी, मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड यांनी दिली अधिक माहिती. 

GLOBOCAN 2022 नुसार, प्रोस्टेट कॅन्सर हा जगातील पुरुषांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कॅन्सर असून कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या कारणांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. वय वाढल्यास, विशेषतः 50 वर्षांनंतर, प्रोस्टेट कॅन्सरचा धोका अधिक असतो. विशेषतः वय वाढल्यावर, अशी प्रोस्टेट समस्येची ‘सायलेंट साईन्स’ दुर्लक्षित करू नयेत. 

लघवीसंबंधी त्रास:

प्रोस्टेट मूत्रमार्गाभोवती असल्यामुळे त्याच्या आकारात बदल झाला की लघवीचा प्रवाह अडथळला जाऊ शकतो. हे बदल प्रोस्टेट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. लक्षणांमध्ये समावेश होतो:

  • लघवी वारंवार लागणे, विशेषतः रात्री
  • लघवीची तीव्र इच्छा आणि लघवी सांडणे किंवा गळणे
  • लघवी सुरू करण्यास त्रास होणे
  • मूत्राशय पूर्ण रिकामा न होणे
  • लघवीचा प्रवाह कमी होणे किंवा मध्येच थांबणे, लघवी करताना जोर लावावा लागणे
  • लघवीत रक्त येणे
ही सर्व लक्षणं प्रोस्टेटच्या त्रासाचे संकेत असू शकतात आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये. वेळेत तपासणी केल्यास प्रोस्टेट कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यावर ओळखता येतो.

Prostate Problem वर काय आहे आयुर्वेदिक उपाय, बाबा रामदेवांनी दिल्या काळजी घेण्याच्या टिप्स

लैंगिक आणि स्खलनासंबंधी त्रास

प्रोस्टेट ग्रंथी प्रजननाशी थेट संबंधित असल्यामुळे त्यातील कॅन्सरमुळे स्खलनात वेदना, इरेक्टाइल डिसफंक्शन किंवा वीर्यात रक्त दिसणे अशी लक्षणं दिसू शकतात.

पेल्विक भागात वेदना

प्रोस्टेट कॅन्सर वाढल्यावर तो आसपासच्या स्नायूंमध्ये आणि अवयवांमध्ये पसरू शकतो, ज्यामुळे पेल्विक भागात, पाठीच्या खाली आणि नितंबांमध्ये वेदना होऊ शकते.

वजन कमी होणे, अशक्तपणा आणि थकवा:

ही लक्षणं सर्वसाधारण असली तरी काही वेळा ती प्रोस्टेट कॅन्सरचे सूचक असू शकतात.

हाडांमध्ये वेदना

प्रोस्टेट कॅन्सर हाडांमध्ये पसरू शकतो (metastasis), ज्यामुळे हाडांमध्ये वेदना जाणवते. कोणतीही नवीन किंवा अचानक आलेली हाडांची वेदना त्वरित तपासायला हवी. प्रोस्टेट कॅन्सरची जोखीम वाढवणारे घटक:

  • वय वाढणे
  • कुटुंबात प्रोस्टेट कॅन्सरचा इतिहास असणे
  • आफ्रिकन वंश (African ancestry)
  • काही विशिष्ट अनुवंशिक (genetic) घटक
या जोखमींमध्ये असलेल्या पुरुषांनी नियमित आरोग्य तपासणी करून घेतल्यास कॅन्सर लवकर ओळखता येऊ शकतो.

प्रोस्टेट कॅन्सरसाठी तपासण्या आणि निदान पद्धती:

  1. डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन (DRE): डॉक्टर बोटांनी प्रोस्टेटची तपासणी करून गाठ, वाढ किंवा कोणताही असामान्य बदल आहे का ते पाहतात
  2. PSA (Prostate-Specific Antigen) टेस्टः रक्तातील PSA पातळी वाढलेली असल्यास ती प्रोस्टेट कॅन्सरचे संकेत असू शकते. ही एक सोपी रक्त तपासणी असून प्राथमिक स्क्रीनिंगसाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते
  3. इमेजिंग: जर PSA पातळी जास्त आढळली, तर पुढील तपासण्या म्हणून ट्रान्सरेक्टल अल्ट्रासाऊंड (TRUS) किंवा MRI करण्याचा सल्ला दिला जातो
  4. बायोप्सी: जेव्हा क्लिनिकल तपासणी आणि चाचण्यांचे निष्कर्ष प्रोस्टेट कॅन्सर सूचित करतात, तेव्हा बायोप्सी केली जाते. निदान निश्चित करण्यासाठी ही पद्धत सर्वात विश्वसनीय मानली जाते.
तुम्ही तुमच्या शरीराला सगळ्यात चांगलं ओळखता, त्यामुळे नेहमीपेक्षा काही वेगळं जाणवलं तर ते दुर्लक्षित करू नका. प्रोस्टेट कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यावर ओळखला गेला, तर त्यावर उपचार शक्य आणि यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते.

नियमित आरोग्य तपासणी आणि कोणतीही संशयास्पद लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे, हे दीर्घकाळासाठी निरोगी जीवन आणि कॅन्सरमुक्त आयुष्य जगण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे.

पुरूषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या Prostate Cancer ची सुरूवातीची 5 लक्षणे, वेळीच ओळखा

Web Title: The silent signs of prostate trouble you shouldn t ignore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • men health
  • Prostate Cancer symptoms

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Jan 02, 2026 | 10:40 PM
Sieara आणि Creta ची हवा टाइट करण्यासाठी Nissan Kait SUV आली! भारतात होणार का लाँच?

Sieara आणि Creta ची हवा टाइट करण्यासाठी Nissan Kait SUV आली! भारतात होणार का लाँच?

Jan 02, 2026 | 10:09 PM
Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य

Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य

Jan 02, 2026 | 09:55 PM
जपानच्या लोकांचे आयुष्य दीर्घ कसे? काय आहेत त्यांच्या सवयी? जाणून घ्या

जपानच्या लोकांचे आयुष्य दीर्घ कसे? काय आहेत त्यांच्या सवयी? जाणून घ्या

Jan 02, 2026 | 09:45 PM
Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार

Jan 02, 2026 | 09:39 PM
Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

Jan 02, 2026 | 09:26 PM
Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन! महापालिका निवडणुकीसाठी ‘हे’ दोन उमेदवार झाले बिनविरोध

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन! महापालिका निवडणुकीसाठी ‘हे’ दोन उमेदवार झाले बिनविरोध

Jan 02, 2026 | 09:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM
Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jan 02, 2026 | 06:56 PM
Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Jan 02, 2026 | 06:41 PM
Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Jan 02, 2026 | 06:09 PM
Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Jan 02, 2026 | 05:43 PM
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.