बसल्यानंतर लगेच पेंग येते? शरीरात थकवा नाहीतर असू शकतो 'या' गंभीर आजाराचा धोका
जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत काम, आहारात होणारे बदल, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. पण काहीवेळा झोप पूर्ण करूनसुद्धा शरीरात कायमच थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. सकाळी उठल्यानंतर अंगात सुस्तपणा जाणवू लागतो, याशिवाय काम करण्याची जास्त इच्छा होत नाही. शरीरात खूप जास्त आळशीपणा जाणवू लागतो. याला जीवनशैलीतील चुकीच्या सवयी कारणीभूत ठरतात. प्रत्यक्षात केलेल्या काही चुकांमुळे शरीराचे संतुलन बिघडते. त्यामुळे कायमच आराम करून नाहीतर शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी योग्य सवयी फॉलो करणे आवश्यक आहे. झोप व्यवस्थित पूर्ण झाल्यानंतर सुद्धा शरीरात थकवा निर्माण होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात वाढलेला मानसिक तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जाण्याऐवजी चिंतेत जातो. सतत चिंता, विचारांचा घोळ किंवा कामाचा तणाव वाढल्यामुळे मेंदूच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. रात्री झोपल्यानंतर मेंदूला विश्रांतीची आवश्यकता असते. झोप व्यवस्थित पूण न झाल्यामुळे सकाळी अजिबात फ्रेश वाटत नाही. याशिवाय योग्य आहार घेऊ सुद्धा शरीराची पचनक्रिया बिघडते. तसेच जड, तेलकट, गोड किंवा अतितिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. यामुळे मेंदूचा रक्तप्रवाह बिघडून जातो. याशिवाय शरीराला स्लिपप्निया, थायरॉईड, ब्लड शुगर, डिप्रेशन इत्यादी आजारांमुळे सुद्धा सुस्तपणा जाणवतो.
शरीरात वाढलेला थकवा आणि सुस्तपणा कमी करण्यासाठी योग्य दिनचर्या फॉलो करणे आवश्यक आहे. यासाठी सकाळी उठल्यानंतर योग्य वेळी झोपावे आणि उठावे. झोपण्याच्या एक ते दोन तास आधी मोबाईल फोन अजिबात वापरू नये. यामुळे शांत झोप लागते. झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कायमच थंड हवेच्या ठिकाणी झोपावे. चांगल्या झोपेसोबतच संतुलित आहार घेणे सुद्धा गरजेचे आहे. आहारात डाळभात, दालखिचडी, सूप, दूध इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे पचनक्रिया निरोगी राहते आणि शरीरातील घाण बाहेर पडून जाते.
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटं व्यायाम, योगासने आणि प्राणायाम करणे गरजेचे आहे. यामुळे मन शांत होते आणि शारीरिक हालचाली वाढतात. नियमित शारीरिक हालचाली केल्यास खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होण्यासोबतच तुम्ही कायम निरोगी राहता. चांगल्या झोपेसाठी मन शांत ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय महिन्यातून एकदा रक्तातील लोह, थायरॉइड आणि जीवनसत्तव बी१२ चाचणी करणे गरजेचे आहे.
थकवा म्हणजे काय?
ही एक अशी स्थिती आहे जिथे तुम्हाला ऊर्जा आणि उत्साहाची कमतरता जाणवते, ज्यामुळे दैनंदिन कामे करणे कठीण होते.हा शारीरिक किंवा मानसिक असू शकतो.
थकव्याची कारणे काय आहेत?
झोप न लागणे, व्यायामाचा अभाव, किंवा ताणतणाव ही सामान्य कारणे आहेत.जंक फूड खाणे, पुरेसे पाणी न पिणे, किंवा कॅफिन आणि अल्कोहोलचे अतिसेवन.काहीवेळा थायरॉईड समस्या, हार्मोनल असंतुलन किंवा यकृत आणि मूत्रपिंडाचे आजार यासारख्या समस्यांमुळे थकवा येऊ शकतो.
थकवा कमी करण्यासाठी उपाय कोणते?
भरपूर फळे आणि भाज्या खा, जंक फूड टाळा आणि कॅफिन व अल्कोहोलचे सेवन कमी करा.नियमित शारीरिक हालचाली करा. तुमची सहनशक्ती वाढवण्यासाठी व्यायाम फायदेशीर ठरतो.






