शिवसेना खासदार संजय राऊत यांना आतड्यांच्या कॅन्सरची लागण!
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्यांच्या स्पष्ट भूमिकांमुळे कायमच चर्चेत असतात. राजकारण असो किंवा कोणताही मुद्दा ते आपली भूमिका ठाम पणे मांडतात. पण निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊतांची तब्येत बिघडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांनी अचानक आलेल्या आजारपणामुळे राजकारणातून ब्रेक घेतला आहे. त्यांना आतड्यांच्या कॅन्सरचे निदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण देण्यात आलेली बातमी खरी असल्याची अधिकृत माहिती अजूनही कुठे देण्यात आलेली नाही. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीरातील सर्वच अवयव कायमच हेल्दी असणे आवश्यक आहे. त्यातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे आतड्या. खाल्ले अन्नपदार्थ आतड्या शोषून घेतात. पण आतड्यांमध्ये कॅन्सरच्या पेशी निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर बदल दिसू लागतात.(फोटो सौजन्य – pinterest)
थंडीत सांध्यांमध्ये वेदना का होतात? नियमित फॉलो करा ‘या’ सवयी, अजिबात आखडणार नाहीत शरीरातील हाडे
कॅन्सरचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या अंगांवर शहारे येतात. या आजाराची लागण झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये हलकी पोटफुगी, भूक न लागणे, शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यात अडथळे निर्माण होणे इत्यादो गंभीर लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती गंभीर लक्षणे दिसून येतात? दैनंदिन जीवनातील कोणत्या सवयी कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर आतड्यांमध्ये अनियंत्रित कॅन्सरच्या पेशी वाढू लागतात. यामुळे पोटात दुखणे, उलट्या, मळमळ, वारंवार बद्धकोष्ठता, शरीराच्या कोणत्याही अवयवांमधून रक्त येणे, पोट फुगणे, अपचन, भूक कमी होणे, वजन झपाट्याने कमी होणे, मलावाटे रक्त जाणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने कोलनॉस्कोपी किंवा स्टूल टेस्ट केल्यास कॅन्सरचे निदान होईल.
जीवनशैलीत अनेक चुकीच्या सवयी कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात. नियमित जंक फूड खाणे, अतिप्रमाणात लाल मांस खाणे, मद्यपान, सतत दारूचे सेवन इत्यादी कारणामुळे शरीराला हानी पोहचते. शारीरिक हालचालींचा अभाव, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव, तणावपूर्ण जीवनशैली इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर कोणत्या ना कोणत्या गंभीर आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे दीर्घकाळ शरीर निरोगी ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण धान्ये आणि फळे इत्यादी अनेक पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय शरीराला व्यायामाची हालचाल, प्राणायाम, व्यायाम करणे आवश्यक आहे.
कोलन कर्करोग म्हणजे काय?
कर्करोग मोठ्या आतड्याच्या कोलन या सर्वात लांब भागात सुरू होतो.हा पचनसंस्थेचा शेवटचा भाग असतो.
कोलन कर्करोगची लक्षणे?
सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे जाणवत नाहीत.पोट फुगणे किंवा सूज येणे.भूक न लागणे किंवा वजन कमी होणे.शौचाच्या सवयींमध्ये बदल होणे.पोटात दुखणे.
कर्करोगाचे उपचार कसे केले जातात?
उपचार हे कर्करोगाचा प्रकार आणि टप्प्यावर अवलंबून असतात.उपचारांच्या पर्यायांमध्ये शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी, केमोथेरपी, हार्मोन थेरपी, इम्युनोथेरपी आणि लक्ष्यित थेरपी यांचा समावेश असतो.






