स्वयंपाक घरातील 'या' पांढऱ्या पदार्थामुळे शरीरात वाढतो मधुमेह- कोलेस्ट्रॉचा धोका
चुकीची जीवनशैली फॉलो केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. त्यामुळे आहारात कायमच सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. पण सतत जंक फूड, मद्यपान किंवा पोषक घटकांच्या कमतरतेमुळे शरीराला हानी पोहचते. आपल्यातील अनेकांना सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याची सवय असते. पण उपाशी पोटी चहा कॉफीचे सेवन केल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढते आणि कायमच अपचनाची समस्या उद्भवते. आहारात साखरेचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. सतत चहा कॉफी किंवा इतर गोड पदार्थ खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि मधुमेह होतो.(फोटो सौजन्य: Pinterest)
दैनंदिन आहारात तिखट तेलकट पदार्थांचे सेवन आणि मानसिक ताण घेतल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते. शरीरात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलाकडे सतत दुर्लक्ष केल्यामुळे हार्ट ब्लॉकेज किंवा कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला अतिप्रमाणात साखर खाल्यामुळे आरोग्यावर नेमके कोणते गंभीर परिणाम दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. आहारात अतिशय कमी प्रमाणात साखर खावी.
रोजच्या आहारात अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्यामुळे शरीराच्या कोणत्याही अवयवाला सूज येण्याची जास्त शक्यता असते. साखर सूज वाढण्याच्या प्रक्रियेला चालना देते. जास्त गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे ब्लड व्हेसल्सच्या भिंतींवर अतिरिक्त तणाव निर्माण होतो. याशिवाय रक्तवाहिन्या अतिशय कमकुवत होऊन जातात. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते. याशिवाय काहीवेळा अचानक छातीत वेदना होणे, हार्ट ब्लॉकेजची समस्या उद्भवते.
सतत गोड पदार्थांचे किंवा साखरेचे सेवन केल्यामुळे शरीरात उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. रक्तदाब असंतुलित होतो. रक्तदाब वाढल्यानंतर हृदयावर जास्तीचा तणाव निर्माण होतो. याशिवाय हृदय कमकुवत होऊन जाते. रक्तदाब कमी झाल्यानंतर हृदय कमजोर होणे किंवा हार्ट अटॅक संबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे गोड पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवावे.
शरीरात उच्च कोलेस्ट्रॉल वाढणे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. आहारात सतत तिखट किंवा तेलकट, गोड पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते. उच्च कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा झाल्यानंतर रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे हार्ट अटॅक किंवा हार्ट ब्लॉकेजची समस्या उद्भवते.
कंबरेवर वाढलेले फॅट कमी करण्यासाठी कॉफीमध्ये मिक्स करा ‘हा’ पदार्थ, महिनाभरात दिसून येईल शरीरात बदल
कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?
कोलेस्ट्रॉल हा चरबीसारखा पदार्थ आहे जो यकृतात तयार होतो आणि शरीराच्या सर्व पेशींमध्ये आढळतो. पेशींच्या पडद्याचा मूलभूत घटक म्हणून, व्हिटॅमिन डी आणि हार्मोन्स बनवण्यासाठी हे आवश्यक आहे.
कोलेस्ट्रॉलची पातळी मोजणे:
तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी मोजण्यासाठी लिपोप्रोटीन पॅनेल (Lipoprotein Panel) केले जाते.
उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे उपाय:
भाज्या, फळे आणि विरघळणारे फायबर (soluble fiber) असलेले पदार्थ खा. याने LDL कोलेस्ट्रॉल कमी होते. नियमित व्यायाम केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवता येते.