बदलत्या जीवशैलीचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच दिसून येतो. अश्यावेळी आरोग्यासंदर्भात अनेक समस्या वाढण्याची शक्यता असते. पण कमी वयात नजर कमी होण्याचा त्रास देखील जाणवू लागतो. कामानिमित्त वारंवार मोबाईल किंवा कॉम्पुटर पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो. हळूहळू नजर कमी होऊ लागते. त्यामुळे कमी वयातच चष्मा लागतो. त्यामुळे नजर चांगली करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचे सेवन करू शकता. यामुळे नजरेची समस्या दूर होण्यास मदत होते. घरातील दुधामध्ये काही पदार्थ मिक्स करून खाल्ल्याने घरच्या घरी आपण डोळयांचे आरोग्य सुधारू शकतो. रोजच्या वापरातले कोणते पदार्थ वापरून आपण आपली दृष्टी चांगली करू शकतो ते पाहूया…
केसर
केसर खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. केसरमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे दृष्टी चांगली होण्यास मदत होते. रोज एका ग्लास दुधात ३ ते ४ काड्या केसर टाकून पिल्याने आपला चष्मा लवकरच दूर होईल आणि नजर लवकर सुधारेल.
बदाम
बदाममध्ये व्हिटॅमिन्स आढळून येतात. त्यामुळे बदाम डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. ६ ते ७ बदाम रात्रभर पाण्यात भिजत टाकून ठेवा. त्यानंतर सकाळी त्याची बारीक पेस्ट बनवून एक ग्लास दुधात मिक्स करून प्या. यामुळे तुमची त्वचा देखील तुकतुकीत होऊन तुम्ही तरुण दिसू शकता.
मध
डोळ्यांच्या आरोग्यासाठी मध फायदेशीर आहे. मधामध्ये एण्टी इंफ्लेमेटरी आणि एंटीऑक्साडेंटचे गुणधर्म आहेत.त्यामुळे तुम्ही एक ग्लास दुधात एक चमचा मध दूधात टाकून प्यायल्याने तुमच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारेल. मधामुळे आरोग्यासंबंधित इतरही लाभ तुम्हाला मिळतात. दुधात मिक्स करून जर मध तुम्हाला प्याचे नसेल तर तुम्ही पाण्यात टाकून सुद्धा पिऊ शकता.
तुळस
तुळस ही अनेक आजारांवर गुणकारी आहे. तुळशीचे पाने कमजोर नजर सुधारण्यास लाभदायक ठरतात. ५ ते ६ तुळशीची पाने दूधात उकळून ते दूध गरम करून पिल्याने अनेक फायदे होतात. दृष्टी सुधारते.
गाजर
गाजरामध्ये व्हिटॅमिन्स ए आणि बिटा कॅरोटीन असते. ज्यामुळे डोळ्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. गाजराचा रस काढून तो दूधात टाकून पिल्याने खूपच लाभदायक ठरतो. दूधात गाजराचा रस मिक्स करुन पिल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.






