काय घडलं नेमकं?
३ एप्रिलच्या रात्री हडपसर- सासवड रोडलगत दिवे घाट पायथ्याशी काची कंपनीजवळील मोकळ्या जागेत एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू करून परिसरातील माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान प्रकाश माने याला ताब्यात घेतले. तो वडकी नाला (ता. हवेली, जि. पुणे) येथे राहणारा आहे. त्याची चौकशी करण्यात आली.
बारामतीत लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला अन्…
सखोल चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने संबंधित महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महिलेने त्याला प्रतिकार केला आहे. त्यामुळे संतापाच्या भरात आरोपीने तिचा गळा दाबला आणि डोक्यात दगड मारून तिची हत्या केली असे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून तिची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.
संतापजनक! शाळेच्या गेटसमोरच तरुणाचे अश्लील चाळे; नगरसेविकेने घेतली दखल
राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शिवाजीनगर भागातील एका नामांकित शाळेच्या गेटसमोरच एका तरुणाने कारमध्ये बसून शाळकरी मुलींकडे पाहत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी भरदुपारी ही घटना घडली आहे.
दरम्यान, हा प्रकार समोर येताच एका नगरसेविकाने याची गंभीर दखल घेत पोलिसांकडे संबंधित तरुणाविरोधात तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात मात्र, चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात प्रणव केदार (रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) असे गुन्हा नोंदवण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
Madhyapradesh Crime: भररस्त्यात दुचाकीस्वाराची निर्घृण हत्या, नंतर मांस खाल्ले, रक्त प्यायले आणि…
Ans: दिवे घाट पायथ्याशी हडपसर–सासवड रोडलगत ही घटना घडली.
Ans: प्रकाश विभीषण माने (वय 29) याला पोलिसांनी अटक केली आ
Ans: आरोपीने महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, विरोध केल्याने तिचा गळा दाबून आणि दगडाने वार करून खून केल्याचे तपासात समोर आले






