वजन कमी करण्यासाठी हळद आहे गुणकारी
वाढत्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर किंवा लठ्ठपणा वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. लठ्ठपणा हा एक गंभीर आजार आहे. अनेक लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी जीममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करतात, तर काही लोक प्रोटीन पावडरचा वापर करून वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. पण एवढ्या गोष्टी करूनही अनेकदा वजन कमी होत नाही. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन, अपुऱ्या झोपेचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर हळूहळू आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. वजन वाढल्यानंतर मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल इत्यादी हृद्यासंबंधित आजार जाणवू लागतात. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घेत जीवन जगले पाहिजे.
शरीरात शारीरिक हालचालींची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यसंबंधित समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. या समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात. मात्र घरगुती उपाय करून सुद्धा तुम्ही वाढलेले वजन कमी करू शकता.वाढलेले वजन कमी करण्यासाठी हळदीचा वापर केल्यास वजनात झपाट्याने घट होईल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी हळदीचा वापर कसा करावा? हळदीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा:वर्कआउट करूनही वजन कमी होत नाही? फॉलो करा या टिप्स
वजन कमी करण्यासाठी हळद अतिशय प्रभावी आहे. कारण हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन पोटावरील चरबी जाळून टाकण्यासाठी मदत करतात. कर्क्यूमिन नावाचा घटक पोटावरील आणि शरीराच्या इतर भागावरील चरबी जाळून टाकण्यास मदत करते. तसेच हळदीचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. हळदीचे पाणी प्यायल्यामुळे पोटाला आलेली सूज कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी हळद आहे गुणकारी
हळदीचे पाणी आरोग्यासाठी गुणकारी आहे. एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हळद मिक्स करून नियमित उपाशी पोटी प्यायल्यास पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होईल. हे पाणी अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. तसेच तुम्ही एक ग्लास पाण्यात हळद टाकून हे पाणी उकळवून थंड करून पिऊ शकता. या पाण्याचे रिकाम्या पोटी सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील.
लिंबामध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते. विटामिन सी युक्त पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरासोबतच त्वचेला सुद्धा अनेक फायदे होतात. लिंबू आणि हळदीचे पाणी नियमित प्यायल्यास वाढलेले वजन झपाट्याने कमी होईल. हे पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस आणि हळद मिक्स करून प्या. रिकाम्या पोटी हे पाणी नियमित प्यायल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल.
हे देखील वाचा:Laptop Care Tips: लॅपटॉप वर्षानुवर्षे नवीन राहील, फक्त या 5 गोष्टी करा
हळदीचे दूध नियमित प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. एक ग्लास गरम दुधात चिमूटभर हळद टाकून मिक्स करून प्या. यामुळे वाढलेले वजन झपाट्याने कमी होईल. शिवाय रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. हळदीच्या दुधाचे सेवन तुम्ही रात्री झोपताना सुद्धा करू शकता.