चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी १० रुपयांच्या तुरटीचा 'या' पद्धतीने करा वापर
बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. चुकीच्या वेळी आहार, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव, मानसिक तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरासोबतच त्वचेवर दिसून लगेच दिसून येतो. सतत येणाऱ्या घामामुळे, धूळ, माती आणि प्रदूषणामुळे त्वचा खूप जास्त टॅन होऊन जाते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला कायमच दुर्लक्ष करतात. पण असे न करता त्वचेची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे स्किन केअर प्रॉडक्ट वापरतात. कधी फेसमास्क लावला जातो तर कधी फेसपॅक लावून त्वचेची काळजी घेतली जाते. याशिवाय महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून घेतात. यामुळे काहीकाळ त्वचा अतिशय सुंदर दिसते. मात्र कालांतराने त्वचेवर पुन्हा एकदा टॅनिंग वाढते.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा अतिशय काळवंडलेली वाटते. मेकअप केल्यानंतर सुद्धा त्वचेवर काळे डाग दिसतात. त्यामुळे त्वचेची वरून काळजी घेण्यापेक्षा त्वचेला आतून पोषण देणे खूप जास्त गरजेचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्वयंपाक घरातील तुरटीचा वापर करून फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. तुरटीचा वापर आरोग्य आणि त्वचेसाठी केला जातो. यामध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म त्वचा आतून स्वच्छ करतात. रात्री झोपण्याआधी त्वचेवर तुरटीचा फेसपॅक लावावा. यामुळे त्वचेवर नॅच्युरल ग्लो येण्यास मदत होते. जाणून घ्या तुरटीचा फेसपॅक बनवण्याची सोपी कृती.
फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये तुरटी पावडर घेऊन त्यात नारळाचे तेल टाकून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून १५ ते २० मिनिट तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास त्वचेच्या सर्व समस्या कमी होण्यास मदत होईल.
मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी गुलाबपाण्याचा वापर केला जात आहे. गुलाब पाण्यात असलेल्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे त्वचा हायड्रेट राहते. याशिवाय त्वचेवर फ्रेशनेस वाढतो. फेसपॅक तयार करताना वाटीमध्ये तुरटी पावडर घेऊन त्यात गुलाब पाणी मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा आणि पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून टाका.