केळी हे एक सामान्य फळ आहे. हे एक असे फळ आहे जे प्रत्येक मोसमात बाजारात उपलब्ध असते. तसेच यांची किंमत कमी असल्याकारणाने अनेकजण केळीचे सेवन करत असत. केळीमध्ये अनेक पोषक घटक आढळली जातात जी आपल्या आरोग्यासाठी फायद्याची ठरतात. केळीबाबत अनेक गोष्टी चांगल्या जरी असल्या तरी याच्याशी निगडित एक गोष्ट फार त्रासदायक आहे. ही गोष्ट म्हणजे केळीचे लवकर खराब होणे.
बऱ्याचदा आपण केळी बाजारातून खरेदी केली की अवघ्या काही दिवसांतच ती काळी पडून मग खराब होऊ लागतात. अशावेळी त्यांना योग्य वेळी नाही खाल्ले तर त्यांचे नुकसान होते. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, काही सोप्या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही अवघ्या आठवडाभर काळी न पडता फ्रेश ठेवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही घरगुती टिप्सचा वापर करावा लागेल.
हेदेखील वाचा – भाजीत तेल जास्त झालं? मग चिंता सोडा आणि या घरगुती टिप्सचा वापर करा

अनेकांना असे वाटते की, केळी फ्रिजमध्ये ठेवून आपण दीर्घकाळ फ्रेश ठेवू शकतो. मात्र हे चुकीचे आहे. उलटे फ्रिजमध्ये केळी ठेवल्याने लवकर काळी पडतात. यामुळे ती खराब होतात आणि त्यांची चवही बिघडते. थंड तापमानामुळे केळींची पिकण्याची प्रक्रिया थांबते, परंतु त्यांची बाह्य त्वचा लवकर खराब होतात. त्यामुळे केळी नेहमी खोलीच्या तापमानात ठेवा, योग्य तापमानात केली दीर्घकाळ फ्रेश राहतात.

तुम्ही केळी कुठे ठेवत आहात ही गोष्टदेखील त्याच्या फ्रेशनेसवर परिणाम करते. केळी कधीही गॅस स्टोव्ह, ओव्हन किंवा अन्य गरम उपकरणांच्या जवळ ठेऊ नये. गरम तापमानामुळे केळी लवकर पिकतात आणि खराब होतात. यामुळेच केळी नेहमी हवेशीर आणि खुल्या वातावरणात ठेवावी. असे केल्याने केळी लवकर खराब होत नाहीत आणि त्यातील पोषकता टिकून राहते.
हेदेखील वाचा – एका मिनिटांत तांब्या-पितळेची भांडी होतील चकचकीत साफ फक्त घरातील या पदार्थाचा वापर करा

केळी खराब होण्यापासून टाळायचे असल्यास त्यांना एका वेगळ्या बाऊलमध्ये ठेवत जा. इतर फळांमुळे इथिलिन वायू बाहेर पडतो जो केळी पिकवण्याचा प्रक्रियेस जलद बनवतो. यामुळेच केळी नेहमी स्वतंत्र बाऊलमध्ये ठेवण्याची सवय लावा. असे केल्याने, केळी इतर फळांच्या संपर्कात येणार नाही आणि याचा फ्रेशनेस दीर्घकाळ राहील. हा एक साधा उपाय असूनही त्याचा परिणाम खूप प्रभावी आहे.






