सध्या गणेशोत्सव हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. या सणानिमित्त बाप्पाची पूजा केली जाते. पूजेवेळी अनेक तांब्या-पितळेच्या भांड्यांचा वापर केला जातो. जसे की तांब्या, पितळेची ताटं, व इतर धातूची भांडी. मात्र पूजेनंतर या भांड्यांची स्वछता राखणे फार गरजेचे असते. ही भांडी फार लवकर खराब होऊ लागतात आणि योग्य वेळी यांना साफ न केल्यास यांच्यावरील चिकट थर लवकर दूर होत नाही.
अनेकदा ही भांडी साफ करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, काही घरगुती गोष्टींचा वापर करून तुम्ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तांब्या, पितळेची भांडी स्वछ करू शकता. मुख्य म्हणजे यात तुम्हाला अधिक मेहनतही घ्यावी लागणार नाही. पाहुण्यांच्या गर्दीत आणि उत्सवाच्या गडबडीत तुम्हाला या घरगुती टिप्सचा फार फायदा होईल. पूजेची भांडी साफ करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचा वापर करू शकता, याविषयी जाणून घ्या.
हेदेखील वाचा – पारंपारीक पद्धतीने बनवा तुळशीच्या पानांचे पवित्र पाणी, डायबिटीज, बीपीसारख्या सर्व आजारांना ठेवेल दूर
यासाठी प्रथम पाण्याने भांड्यांवरील सैल मळ दूर करा. त्यांनतर एक वाटी घेऊन त्यात दोन चमचे व्हिनेगर आणि एक चमचा बेकिंग सोडा घाला आणि मिसळा. यानंतर हे मिश्रण 10-15 मिनिटे भांड्यावर नीट चोळा, मग स्क्रब वापरून पाण्याने ही भांडी स्वछ धुवा. व्हिनेगरमध्ये असलेले ऍसिडिक गुणधर्म आणि बेकिंग सोडाचा स्क्रबिंग इफेक्ट हे भांड्यांवरील काळेपणा आणि मळ सहज काढून टाकतो. तांब्या-पितळेची स्वछ करण्यासाठी हा उपाय फार कामी येतो.
लिंबामधील नैसर्गिक ऍसिड आणि मीठाचा स्क्रबिंग गुणधर्म भांड्यांवरचा चिकट थर दूर करण्यास आणि यावरील चिवट डाग काढण्यास मदत करतात. यासाठी एका वाटीत लिंबाचा रस घेऊन त्यात 1-2 चमचे मीठ घाला आणि मिसळा. मग या मिश्रणाच्या मदतीने पूजेची भांडी घासून साफ करा. याच्या मदतीने भांड्यांवरील चिवट-चिकट डाग अगदी सहज दूर होतात. लिंबाचे नैसर्गिक गुणधर्म धातूंच्या भांड्यांवरील गंज देखील कमी करतात.
हेदेखील वाचा – वयाच्या चाळिशीतही 25 वर्षांचे दिसाल! फक्त हे अनोखे घरगुती उपाय करून पहा
पूर्वीच्या काळी लोक भांडी साफ करण्यासाठी राखेचा वापर करत असायचे. राखेतील गुणधर्म भांडी स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामुळे भांड्यावरील कठीण डाग आणि चिकटपणा सहज दूर होतो. तसेच राख नैसर्गिक असल्यामुळे भांडी गुळगुळीत व स्वच्छ राहतात. यासाठी एका वाटीत थोडी राख घ्या आणि यात हलके पाणी टाका आणि याची पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट सर्व भांड्यांना लावून भांडी स्वछ करा.