हार्ट अटॅक येण्याच्या ३० दिवसांआधी शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
धावपळीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप, मानसिक तणाव, कामाचा तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात तेलकट किंवा तिखट पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात, ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता असते. हृद्य आणि मेंदूला ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात सतत बदल न करता शरीराला पचन होईल अशाच पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय शरीरात शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. (फोटो सौजन्य – iStock)
जगभरात हार्ट अटॅकमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हार्ट अटॅक येऊ मृत्यू होतो. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल हे हार्ट अटॅक येण्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हार्ट अटॅक येण्याच्या 30दिवस शरीरात कोणते बदल होऊ लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.
हार्ट अटॅक येण्याच्या ३० दिवसांआधी छातीमध्ये वेदना होणे, अचानक खांदा दुखणे, याशिवाय तोंडयाच्या जबड्यामध्ये देखील वेदना होऊ लागतात. तर काहींना छातीमध्ये जळजळ, झिणझिण्या किंवा जडपणा वाटू लागतो. छातीवर दाब पडल्यासारखे वाटू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. डावा खांदा आणि हात दुखणे हे हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसणारे प्रमुख लक्षणं आहे.
कामाचा तणाव किंवा इतर अनेक गोष्टींमुळे शरीरात थकवा निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र शरीरातील तीव्र थकव्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या चाचण्या करून आरोग्याची काळजी घ्यावी. शरीरात योग्य पद्धतीमध्ये रक्त पुरवठा न झाल्यामुळे थकवा आणि शरीराची ऊर्जा कमी होऊन जाते. नेहमीपेक्षा जास्त थकल्यासारखे वाटू लागते.
हार्ट अटॅक येण्याच्या ३० दिवस आधी चक्कर येणे, अचानक थकवा येणे किंवा चक्कर आल्यासारखे वाटू लागते. मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे चक्कर येऊ लागते. याशिवाय श्वास घेण्यात अडथळा निर्माण होऊन अस्वस्थ वाटू लागते. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुलर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. शरीराचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे सतत चक्कर येऊ लागते.
हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. छातीमध्ये वेदना झाल्यास किंवा श्वास घेण्यास अडथळे निर्माण होतो आणि फुप्फुसांमध्ये पुरेसा ऑक्सिजन निर्माण होत नाही. थोडस चालल्यानंतर लगेच धाप लागल्यास लगेच तपासण्या करून घ्याव्यात. यामुळे लहान आजाराचे तात्काळ निदान होईल.