मासिक पाळीदरम्यान महिलांमध्ये उद्भवणाऱ्या समस्या:
प्रत्येक महिन्यातील ५ दिवस सर्वच महिलांना मासिक पाळी येते. मासिक पाळीच्या पाच दिवसांमध्ये महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शरीरात वाढलेला तणाव, ऑफिसचे काम, कुटुंबाची जबाबदारी इत्यादी अनेक गोष्टींच्या वाढलेल्या तणावामुळे महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र सतत दुर्लक्ष केल्यामुळे लहान आजार आणखीनच मोठे होऊ लागतात. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र आता देशातील पहिल्या खाजगी कंपनीने महिलांना मासिक पाळीदरम्यान महिन्यातून एक दिवस सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. एल अँड टीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यन यांनी पहिल्यांदाच कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना दर महिन्याला एक दिवस मासिक पाळीनिमित्त रजा देण्याची घोषणा केली आहे. महिला दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या घोषणेमुळे महिलांनी आनंद व्यक्त केला आहे.(फोटो सौजन्य – iStock)
मासिक पाळी आल्यानंतर महिलांना अनेक समस्या उद्भवू लागतात. पोटात दुखणे, ओटीपोटात दुखणे, उलटी सारखं होणे, सतत मूड स्विंग होणे, काम करण्याची इच्छा न होणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. या समस्यांना सामोरे जाण्यासाठी महिलांना आरामाची आवश्यकता असते. मात्र घर आणि कुटुंबाची जबादारी सांभाळताना महिलांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते. महिलांना मासिक पाळीच्या दिवशी सुट्टी दिल्यास कामाचा वाढलेला तणाव कमी होईल आणि आराम मिळेल.
अनेक महिलांमध्ये मासिक पाळीच्या दिवसांमध्ये वारंवार आतड्याची हालचाल होत असते आणि अनेकांना मासिक पाळीच्या पहिल्या किंवा दोन दिवसांत अतिसाराचा त्रास होतो. याशिवाय उलट्या येणे, अशक्तपणा, चक्कर येणे, वाढलेला तणाव इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आराम करणे आवश्यक आहे.
मासिक पाळी आल्यानंतर आतड्यांच्या हालचालींमध्ये बदल होऊ लागतात. आतड्यांचे आकुंचन झाल्यामुळे ओटीपोटात दुखू लागते. त्यामुळे मासिक पाळी आल्यानंतर पोट फुगणे, पोटात दुखणे, ओटीपोटात दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवू लागल्यास गरम पाण्याच्या पिशिवीने कंबर शेकवावी., याशिवाय पोटभर अन्नपदार्थांचे सेवन करावे.
पाळीच्या पहिल्या दिवशी काहींना आतड्यांसंबंधी समस्या उद्भवू लागतात. पोटात जास्त प्रमाणात पेटके आल्यामुळे महिलांना जास्त त्रास होतो. गर्भनिरोधक गोळ्यांचे जास्त सेवन केल्यामुळे पोटात जास्त पेटके येऊ लागतात. त्यामुळे गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करू नये. याशिवाय मासिक पाळी लांबवण्यासाठी किंवा लवकर येण्यासाठी अनेक महिला गोळ्यांचे सेवन करतात. मात्र या गोळ्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत.