शांत राहा. कोणाच्याही भानगडीत पडू नका. ‘आपले काम भले नि आपण भले’ असे केल्यास दिवससुद्धा चांगले जातील. बाकी दिवसांचा कालावधी ठीक राहील. व्यवसायात आपली जबाबदारी इतरांवर टाकू नका. त्यामुळे नुकसान होऊ शकते. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत द्विधावस्था निर्माण होईल. आर्थिक बाबतीत बचत करा. सार्वजनिक ठिकाणी सहभाग टाळा. वैवाहिक जीवन सुखी राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.
सप्ताहात सर्व दिवस चांगले असल्यामुळे कामातील प्रगती दिसून येईल. व्यावसायिकदृष्टया फायद्याचे प्रमाण चांगले राहील. इतरांचे मार्गदर्शन चांगले मिळेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांची शाबासकी मिळेल. राजकीय क्षेत्रात असणारा दुरावा कमी होईल. आर्थिक उत्कर्ष होईल. शेजारधर्माशी मात्र जेवढयास तेवढे राहा. घरगुती वातावरण आनंदी असेल. जोडीदार साथ देईल. मानसिक ताणतणाव कमी होईल. आरोग्य उत्तम राहील.
शुभ गोष्टींचा प्रारंभ होईल. सुखाची चाहूल लागेल. या आठवडयात सर्व दिवसांचा कालावधी उत्तम राहील. त्यामुळे बरीच कामे हातासरशी होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी जो अडथळा येत होता तो आता येणार नाही. नोकरदार वर्गाला कामामध्ये खूप कष्ट वाढतील, पण त्याचा आर्थिक लाभही होईल. त्यामुळे वाईट वाटण्याचे कारण नाही. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. शेजारधर्माविषयी आपुलकी निर्माण होईल. संततीसौख्य लाभेल. जोडीदार खूश असेल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्यात सुधारणा होईल.
व्यावसायिक परिस्थितीत चांगले बदल घडतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत तडजोड स्वीकारावी लागणार नाही. आर्थिक बाबतीत मागील पोकळी भरून काढाल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल. मुलांचे लाड करा, पण शिस्त बिघडू देऊ नका. स्वार्थी मैत्रीपासून लांब राहा. घरगुती वातावरण ठीक राहील. आरोग्य चांगले राहील.
तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका. धीर धरा. इतरांच्या सल्ल्याने काम करण्यापेक्षा स्वत:चे मत तयार करा. त्यामुळे नुकसान होणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. व्यवसायात चालून आलेले प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी करा. नोकरदार वर्गाला कामाचा अनुभव विसरून चालणार नाही. वायफळ खर्च टाळा. राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करणे टाळा. मुलांची आवडनिवड जपाल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या समस्या कमी होतील.
कोणतीही गोष्ट बेफिकीरपणे करणे त्रासाचे ठरेल. इतरांच्या काही गोष्टी नाही पटल्या तरी ऐकून घ्या. त्यावर आपले मत स्पष्टपणे बोलून दाखवू नका. त्यामुळे गैरसमजाचे वादळ निर्माण होऊ शकते. सप्ताहातील सर्वच दिवस जपून हाताळावे लागतील. भागीदारी व्यवसायात नवीन वाटचाल करणे टाळा. नोकरदार वर्गाने कामात लक्ष घालणे हिताचे राहील. आर्थिकदृष्टया बचतीकडे लक्ष केंद्रित करा. कुटुंबातील हेवेदावे दूर ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.
प्रत्येक गोष्टीत सतर्कता बाळगा. वादविवाद करणे टाळा. सध्या आपली बाजू समोरच्याला पटणार नाही हे विसरू नका. त्यामुळे कोणाला कोणत्याच प्रकारचे सल्ले देत बसू नका. अन्यथा स्वत:च त्रास वाढवून घ्याल. व्यवसायात नवीन कोणतीही सुरुवात करू नका. नोकरदार वर्गाला कामाची तासिका वाढवावी लागेल. सामाजिक क्षेत्रातील मोठेपणा करायला गेलात तर तो त्रासाचा ठरू शकतो. कुटुंबाची काळजी घ्या.
चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींचा विचार जास्त मनात येईल. शांत राहून तडजोड स्वीकारा. व्यवसायात नवीन योजनांचा प्रारंभ करण्यापूर्वी आपली आवक-जावक पाहून निर्णय घ्या. उधारीचे व्यवहार टाळा. नोकरदार वर्गाच्या कामाला गती येईल. आर्थिक बाबतीत अनपेक्षित लाभ होईल. राजकीय क्षेत्रात कार्यरत राहाल. नातेवाईकांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. भावंडांची जबाबदारी पार पाडत असताना वादविवाद टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
सप्ताहातील सर्वच दिवसांचा कालावधी उत्तम असेल. व्यावसायिकदृष्टया होत असलेली धावपळ कमी होईल. नवीन व्यावसायिक दालनाचा शुभारंभ होईल. नोकरदार वर्गाच्या कामकाजात बदल होतील. आर्थिक मार्ग मोकळे होतील. राजकीय क्षेत्रात पुढारीपणा कराल. जिवलग मित्राची भेट होईल. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. मानसिक ताणतणाव कमी होईल, त्यामुळे आरोग्य उत्तम राहील.
कारण नसताना खर्च वाढू शकतो. व्यावसायिकदृष्टय़ा नेहमीपेक्षा फायद्याचे प्रमाण जास्त असेल. त्यामुळे गुंतवणूक करणे सोपे होईल. नोकरदार वर्गाला कामामध्ये बढती मिळेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात उत्साह वाढेल. मित्रपरिवाराशी जवळीक साधाल. घरगुती वातावरण आनंदी राहील. मानसिक समाधान लाभेल. एकूणच सप्ताह भाग्योदयाचा असेल. आरोग्य उत्तम राहील.
जनसंपर्क वाढेल. व्यक्तिमत्त्व खुलेल. मोठया खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल. कामकाज सुरळीत चालू राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कालावधी उत्तम असेल. व्यवसायातील आवक-जावक वाढेल. व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. नोकरदार वर्गाला कामाचा आढावा घेताना वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. खर्चाची बाजू सांभाळा. समाजसेवा करताना स्पष्टवक्तेपणा टाळा. मैत्रीचे नाते दृढ होईल. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.
या दिवसांत टोकाचे निर्णय घेणे टाळा. क्रोधावर नियंत्रण ठेवा. स्पष्ट बोलण्याने इतरांची मने दुखावली जाऊ शकतात. तेव्हा शांत राहिलेले चांगले. बाकी दिवस ठीक असतील. व्यवसायात हिशोबाच्या नोंदी ठेवा. नोकरदार वर्गाने कामाचे वेळापत्रक प्रथम तयार करा. आर्थिक व्यवहार जपून करा. मैत्रीच्या नात्यात दुरावा येणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. आहारावर नियंत्रण ठेवा.