जगावर घोंघावतंय नव्या विषाणुच्या संक्रमणाचे संकट; Norovirus ने वाढवली इंग्लंडनंतर 'या' देशाची चिंता (फोटो सौजन्य: iStock)
वर्ष 2019-2021 या काळात संपूर्ण जगावर दु:खाचे सावट होते. या काळात कोरोना व्हायरसने हाहा:कार माजवला होता. या व्हायरसमुळे अनेक लोकांचे प्राण गेले अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले होते. आता कोरोनानंतर आणखी एक संसर्गजन्य विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. हा विषाणू इंग्लंडमध्ये वेगाने पसरत असून कावासाकी नोरोव्हायरस संसर्ग (Kawasaki Norovirus Infection) सार्वजनिक आरोग्यासाठी मोठी चिंता बनला आहे. आरोग्य तज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला असून, रुग्णालयांनी गर्दी टाळण्याचा सल्ला दिला आहे.
या नव्या व्हायरमुळे आता सर्वांच्या मनामध्ये पुन्हा भीती निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा सर्व काही ठप्प तर होणार नाही ना? हा नवा व्हायरस किती घातक असू शकेल?
काय आहे नोरोव्हायरस?
नोरोव्हायरल हा एक अत्यंत संक्रमण विषाणू असून हा मूख्यत: हिवाळ्यात अधिक सक्रिय होतो. यासा “विंटर वोमिटिंग बग” देखील म्हणतात. या विषाणूचा संसर्ग झाल्यास अचानक आणि तीव्र उलटी, जुलाब यासारखी लक्षणे दिसून येतात. २०२५ च्या पहिल्या सात आठवड्यांत यूकेमध्ये 400 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, यामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
नोरोव्हायरसची वाढती प्रकरणे आणि उपाययोजना
ब्रिटिश आरोग्य आणि सुरक्षा कार्यकारी (HSE) ने दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या हिवाळी काळात आरोग्य केंद्रांवर मोठा ताण आहे आणि नोरोव्हायरसच्या वाढत्या संख्येमुळे परिस्थिती अधिकच बिघडू शकते. हा व्हायरस इंग्लंडपासून, अमेरिका आणि युरोपातील इतर देशांमध्येही या वेगाने वाढत आहे. त्यामुळे स्वच्छता नियम काटेकोरपणे पाळण्याचे आणि संसर्ग टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नोरोव्हायरसचे लक्षण-
नोरोव्हायरस संसर्ग झाल्यास पुढील लक्षणे दिसू शकतात.
संक्रमण टाळण्यासाठी अशी घ्या काळजी
नोरोव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या सावधगिरीच्या उपाययोजना खालीलप्रमाणे आहेत-
नोरोव्हायरसचा नवीन प्रकार आणि त्याचा परिणाम
HSE ने दिलेल्या माहितीनुसार, 2024-25 च्या हिवाळ्यात नोरोव्हायररलचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. विशेष करुन GII.17 नावाच्या नवीन व्हेरिएंटमुळे संसर्ग झपाट्याने वाढत आहे. हा नवा प्रकार असल्याने लोकांमध्ये याबाबत प्रतिकारशक्ती कमी आहे आणि त्यामुळे संसर्गाची शक्यता अधिक आहे. डिसेंबर २०२४ मध्ये आयर्लंडमध्येही या विषाणूच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली होती.
संक्रमित देश
सध्या यूके, अमेरिका आणि युरोपातील अनेक देशांमध्ये नोरोव्हायरसचा संसर्ग वाढत असल्याने, सार्वजनिक आरोग्य संस्थांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.