ब्रोकन हार्ट सिंड्रोम नक्की काय आहे (फोटो सौजन्य - iStock)
तुम्हाला माहीत आहे का की ‘मन तुटलं’ हे केवळ शब्द नाहीत तर ती प्रत्यक्षात एक वैद्यकीय स्थिती आहे. याला ब्रोकन हार्ट सिंड्रोम किंवा टाकोसुबो कार्डिओमायोपॅथी म्हणतात. यासंबंधी अलिकडेच झालेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पुरुषांमध्ये ब्रोकन हार्ट सिंड्रोममुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण महिलांपेक्षा दुप्पट आहे.
२०१६ ते २०२० पर्यंत अमेरिकेत या सिंड्रोमचे निदान झालेल्या २ लाख रुग्णांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की या सिंड्रोममुळे होणाऱ्या मृत्युदरात पुरुषांमध्ये ११.२% वाढ झाली आहे, तर त्या तुलनेत महिलांमध्ये हा दर फक्त ५.५% आहे. चला जाणून घेऊया की हे सिंड्रोम काय आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत हे Cleveland Clinic ने दिलेल्या अहवालातून आपण या लेखातून जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हणजे काय?
पुरुषांवर कसा होतो परिणाम
ब्रोकन हार्ट सिंड्रोम ही एक अल्पकालीन स्थिती आहे ज्यामध्ये हृदयाचे स्नायू वेगाने कमकुवत होतात. हे सहसा काही भावनिक किंवा शारीरिक ताणानंतर घडते. या स्थितीत, हृदयाचे काही भाग योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत आणि काही भागांना योग्यरित्या कार्य करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. या स्थितीमुळे, हृदयाची रक्तपुरवठा आणि पंपिंग क्षमता कमी होते. यामुळे, पेशींना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचवणे कठीण होते आणि संपूर्ण शरीरावर परिणाम होऊ लागतो.
ब्रोकन हार्ट सिंड्रोमची लक्षणे काय आहेत?
कोणती लक्षणे ओळखावी
भावनिक किंवा शारीरिक ताणानंतर काही मिनिटांपासून ते काही तासांतच ब्रोकन हार्ट सिंड्रोमची लक्षणे दिसू शकतात. ताणतणावामुळे शरीरात काही हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे हृदयाच्या स्नायू काही काळासाठी कमकुवत होतात. यामुळे, ब्रोकन हार्ट सिंड्रोमची काही लक्षणे हृदयविकाराच्या झटक्यासारखीदेखील वाटू शकतात. त्याची लक्षणे नक्की काय आहे जाणून घ्या
कसे करावे व्यवस्थापन
कशी घ्यावी काळजी
ब्रोकन हार्ट सिंड्रोमवर उपचार करण्याचा कोणताही मार्ग नाही, परंतु काही ताण व्यवस्थापन पद्धती शारीरिक आणि भावनिक ताण कमी करू शकतात. ताण व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही या पद्धतींची मदत घेऊ शकता
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.