ए आर रेहमानच्या घटस्फोटामागील सर्वात मोठे कारण
12 मार्च 1995 रोजी ऑस्कर पुरस्कार विजेते गायक-संगीतकार ए आर रहमान आणि सायरा बानो यांचा विवाहसोहळा पार पडला होता. या दोघांना दोन मुली खतिजा-रहिमा आणि एक मुलगा अमीन आहे. पण, आता लग्नाच्या 29 वर्षांनंतर ए आर रहमान आणि सायरा बानो दोघेही वेगळे होणार आहेत. या बातमीने जगभरात चाहत्यांना धक्का बसला आहे. ए आर रहमानच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आईने सायरासोबत लग्न निश्चित केले होते. पण ‘भावनिक ताणा’मुळे त्यांचे वैवाहिक जीवन आता संपुष्टात आले आहे.
वास्तविक सायरा बानोने मंगळवारी रात्री पतीपासून घटस्फोटाची घोषणा केली. दुसरीकडे, ए आर रहमानने देखील X वर पोस्ट केले आणि या कठीण काळात त्यांचे खासगीपण सांभाळल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. या घटस्फोटाच्या बातमीने चाहते मात्र खूप दु:खी झाले आहेत. दरम्यान हा घटस्फोट भावनिक ताणामुळे होत असल्याचे आता समोर आले आहे. पण, भावनिक ताण म्हणजे काय आणि ते कसे हाताळले जाऊ शकते हे समजून घेण्याची हीच योग्य वेळ आहे, जेणेकरून सामान्य माणसाची तुटलेली नाती वाचवण्याची संधी मिळू शकते (फोटो सौजन्य – Instagram/iStock)
इमोशनल स्ट्रेनबाबत वाच्यता
निवेदनात सायरा बानोने दिलं कारण
सायरा बानोच्या वकील वंदना शाह यांनी आपल्या सायराच्या वतीने निवेदन देताना लिहिले की, लग्नाच्या अनेक वर्षानंतर सायरा यांनी पती ए आर रहमानपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. नात्यातील भावनिक ताण हे याचे कारण आहे. अपार प्रेम असूनही या तणावामुळे त्यांच्यात दरी निर्माण झाल्याचे दोघांनाही दिसून आले. नात्यातील वेदनांमुळे हा निर्णय घेतल्याचेही सायराने आवर्जून सांगितले आहे.
29 वर्षांच्या सहवासानंतर जगप्रसिद्ध संगीतकार A R Rahman चा घटस्फोट, पत्नीने केले जाहीर
ए आर रेहमानने व्यक्त केली भावना
A R Rahman ने देखील इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे आपली व्यथा मांडली आहे. त्यांनी लिहिले की, आम्ही 30 वर्षे पूर्ण करू अशी अपेक्षा होती. परंतु, प्रत्येक गोष्टीचा न पाहिलेला अंत आहे. तुटलेल्या अंतःकरणाच्या भाराखाली देवाचे सिंहासनही थरथरू शकते. तरीही, झालेल्या तुकडे पुन्हा कधीही त्यांची जागा शोधू शकत नसले तरीही, त्यातून एक वेगळा अर्थ कालांतराने सापडतो. तसंच त्याने चाहत्यांचे या काळात साथ देत असल्याबद्दल आभारही मानले आहेत.
इमोशनल स्ट्रेन म्हणजे काय?
नात्यातील भावनिक ताण म्हणजे नक्की काय
ए आर रहमान आणि सायरा बानो यांच्या घटस्फोटाचे कारण ‘भावनिक ताण’ सांगण्यात येत आहे आणि हे प्रत्येक जोडप्याने आणि व्यक्तीने समजून घेणे महत्त्वाचे आहे. किंबहुना, जेव्हा नात्यातील वाढते अंतर हे नातेसंबंधातील तणावाचे कारण बनते तेव्हा त्याला भावनिक ताण म्हणतात. याची अनेक कारणे असू शकतात जसे की कम्युनिकेशन गॅप, विश्वासाच्या अभावामुळे संशय वाढणे इत्यादी. याशिवाय नात्यातील विश्वास गमावणे हे तणावाचे सर्वात सामान्य कारण आहे. अवाजवी अपेक्षा आणि नंतर त्यांची पूर्तता न होणे हेही कारण बनते. नात्यात वेगवेगळ्या गोष्टींमुळे तणाव वाढतो आणि अतिसहन केल्याने मर्यादा संपल्यावर हे नातं जोडलेले राहू शकत नाही आणि माणसांना हा भावनिक ताण वेगळे होण्यास भाग पाडतो.
भावनिक ताणातून कसे पडाल बाहेर?
रीड हेल्थच्या अहवालानुसार, ‘भावनिक ताणा’शी लढण्यासाठी तुम्हाला एकमेकांशी बोलावे लागेल. याचा सरळ अर्थ असा की समस्या सांगितली नाही तर उपाय कसा शोधता येईल?. अशा स्थितीत कोणत्याही नात्यातील मुक्त संवाद हे मजबूत नातेसंबंधाचे लक्षण असते. तुम्हाला काय वाटतंय हे जोपर्यंत तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगत नाही तोपर्यंत त्यावर उपाय शोधणं कठीण होईल. जर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून विभक्त झाला असाल अथवा तुम्हाला तसे करण्याची इच्छा असेल तर तुमच्या मित्र आणि नातेवाईकांशी बोला.
ए आर रहमानने घटस्फोटाच्या पोस्टमध्ये केली मोठी चूक? सोशल मीडियावर चाहते करतायत ट्रोल!
मन करा घट्ट
या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला तुमचे मन वळवावे लागेल. जर तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करत राहिलात तर तुमच्या मनात आणखी नकारात्मक विचार येऊ लागतील. अशा परिस्थितीत तुम्ही सोशल मीडिया, इंटरनेट किंवा कोणत्याही शारीरिक क्रियांवर लक्ष केंद्रित केले तर बरे होईल.
भेटून गोष्टी सोडवाव्या
व्यक्त झाल्याशिवाय समस्या सुटणे कठीण
दुःखातून बाहेर पडण्यासाठी, तुम्हाला स्वतःला आणि तुमच्याकडे काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. कोणतीही वेदना इतकी मोठी असू शकत नाही की ती तुमच्या मनावर अधिक भक्कम ठरेल. या भावनिक ताणानंतर तुम्हाला तुमच्यावर प्रेम करणारे काही लोक देखील भेटतील, कदाचित तुमच्या जोडीदाराबद्दल तुमची विचारसरणी बदलू शकते किंवा तुम्ही त्यांना सर्वकाही बरोबर करण्याची संधी देऊ इच्छित असाल असा विचारही तुम्हाला करता येईल. त्यामुळे बोलणं आणि एकमेकांना भेटून गोष्टी सोडवणं हे अधिक गरेजचं आहे. दोन्ही जोडीदारांनी एकमेकांना संधी देत समजून घेतल्याने हा भावनिक ताण येणार नाही.