ए आर रेहमान यांचा 29 वर्षांनंतर घटस्फोट
संगीतकार ए आर रहमान यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. संगीतकार ए आर रहमान आणि त्याची पत्नी सायरा यांनी वेगळे होण्याची घोषणा केली आहे. संगीतकार एआर रहमान लग्नाच्या 29 वर्षानंतर पत्नी सायरापासून वेगळे होणार असल्याची बातमी आहे. रेहमान आणि सायराच्या वकिलाने एक सार्वजनिक निवेदन जारी करून हे अपडेट सोशल मीडियावर शेअर केले असून, या जोडप्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. पत्नीच्या म्हणण्यानुसार, या नात्यात तिला खूप वेदना होत होत्या, जे सांभाळणे तिच्यासाठी खूप कठीण झाले असल्यामुळेच तिला हे पाऊल उचलावे लागले आहे. (फोटो सौजन्य – Instagram)
निर्णय घाईत घेतला नाही
पब्लिक नोटनुसार रेहमान आणि त्याच्या पत्नीने एकमेकांपासून विभक्त होण्याचा हा निर्णय घाईघाईने घेतलेला नाही. या चिठ्ठीत म्हटले आहे की, बराच वेळ विचार केल्यानंतर सायरा या निष्कर्षापर्यंत पोहोचली आहे. तिने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आता ती तिचे नाते वाचवू शकत नाही आणि हे नातं सांभाळताना तिला खूपच त्रास सहन करावा लागला होता
वाचा प्रसिद्धीपत्रक
ए आर रेहमान यांची पत्नी सायरा यांच्या वकिलाने केले प्रसिद्धीपत्रक जाहीर
अवघ्या महाराष्ट्राला ‘वेड’ लावणाऱ्या जियाच्या मनमोहक अदा; फोटो बघाच!
मानसिक तणावामुळे निर्णय
या प्रसिद्धीपत्रकात लिहिले आहे की, ‘लग्नाच्या अनेक वर्षानंतर सायरा यांनी त्यांचे पती ए.आर. रहमानपासून वेगळे होण्याचा अत्यंत कठीण निर्णय घेतला आहे. त्यांच्या नात्यातील भावनिक तणावानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. एकमेकांवर त्यांचे नितांत प्रेम असूनही, दोघांनाही असे आढळून आले आहे की तणाव आणि अडचणींमुळे त्यांच्यात एक दरी निर्माण झाली आहे जी यावेळी दोघांपैकी कोणीही भरून काढू शकत नाही.
या प्रेस नोटमध्ये पुढे लिहिले आहे की, ‘सायराने अत्यंत दुःखाने सांगितले की की, वेदना आणि त्रासामुळे तिने हा निर्णय घेतला आहे.’ यासोबतच सायरा या आव्हानात्मक काळात लोकांकडून गोपनीयतेची आणि समजून घेण्याची विनंती करते, कारण ती तिच्या आयुष्यातील या कठीण टप्प्यातून जात आहे.
‘पुष्पा 2’ मधील तारक पोनप्पा कोण? या अर्ध्या टक्कल अभिनेत्याने इंटरनेटवर केली खळबळ!
रहमानकडून प्रतिक्रिया नाही
ए आर रहमान यांची ओळख संपूर्ण जगात आहे. त्यांच्या संगीताने सर्वांनाच वेड लावले आहे. अनेक ठिकाणी आपल्या पत्नीसह दिसणाऱ्या रहमानच्या आयुष्यात आलेलं हे वादळ नक्कीच मोठं आहे. मात्र अजूनही रेहमानने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर दुसऱ्या बाजूला सायराने एक प्रकारे हे आरोपच केल्याची आता चर्चा सुरू झाली आहे. फारच माफक बोलणाऱ्या रेहमान यांनी अजून आपली बाजू मांडलेली नाही.