नोरोव्हायरसच्या लक्षणांपासून आराम मिळवण्यासाठी उपाय
काही वर्षांआधी जगभरात कोरोना महामारीने हाहाकार माजवला होता. संपूर्ण जगभरात अनेकांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. यामध्ये अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला. त्यानंतर आता पुन्हा एकदा ब्रिटनमध्ये ‘कावासाकी बग’ वेगाने पसरत आहे. हा विषाणू सगळीकडे वेगाने पसरत आहे. या नवीन विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये उलटी, जुलाबचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूनंतर पुन्हा एकदा नवीन विषाणू पसरत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच ब्रिटिश डॉक्टरांनी लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: ‘या’ आजारांमुळे स्तनांचा आकार होतो लहान, ब्रेस्टमध्ये ‘ही’ लक्षणे दिसताच चुकूनही करू नका दुर्लक्ष
वैद्यकीय अधिकारी डॉ. जॉन बर्क यांनी नोरोव्हायरसच्या या नवीन विषाणूबद्दल माहिती दिली. त्यात ते म्हणाले, नोरोव्हायरस हा संसर्गजन्य साथीचा आजार आहे. हा विषाणू संपर्कातून पसरतो आणि संक्रमित व्यक्तीमध्ये उलट्या आणि जुलाबाची लक्षणे दिसूसंपर्कातून पसरतो आणि संक्रमित व्यक्तीमध्ये उलट्या आणि जुलाबाची लक्षणे दिसून येतात. तसेच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये नव्या विषाणूला ‘विंटर व्होमीटिंग बग’ असे नाव देण्यात आले आहे. कारण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बहुतेक जण घरातमध्येच राहतात, ज्यामुळे हा विषाणू वेगाने पसरत आहे.
ब्रिटनमध्ये पसरलेल्या नवीन विषाणूची लागण झाल्यानंतर हा विषाणू घरच्या घरी सुद्धा बरा होऊ शकतो. यावर डॉक्टर बर्क यांनी सांगितले, उलट्या आणि जुलाबामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. तसेच डिहायड्रेशनचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसांमध्ये भरपूर पाण्याचे सेवन करावे. शिवाय इलेक्ट्रोलाइट्सचे पाणी सतत पित राहावे.
हे देखील वाचा: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, मेंदूचे कार्य वाढून बुद्धी राहील तीक्ष्ण
डॉ. बर्क यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, नोरोव्हायरसचा त्रास जाणवू लागल्यास आहारात टोस्ट किंवा तळलेल्या पदार्थांचे सेवन करण्यावेजी पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. तसेच शरीर पूर्ण बरे होईपर्यंत विश्रांती घ्यावी. या विषाणूची लागण झाल्यानंतर शरीराला पूर्ण बरे होण्यासाठी वेळ लागेल. बरे होण्यासाठी किमान 48 तास घरी राहून विश्रांती घ्यावी आणि पूर्ण बरे वाटल्यानंतरच बाहेर जावे. शिवाय ब्रिटिश डॉक्टरांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे आणि विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे.