लग्न झाल्यानंतर महिला हातांमध्ये हिरव्या बांगड्या का घालतात
भारतीय संस्कृतीमध्ये लग्न झाल्यानंतर महिलांच्या गळ्यात मंगळसूत्र, हातामध्ये हिरव्या बांगड्या, पायामध्ये पैंजण आणि जोडवी इत्यादी दागिने घातले जातात. या दागिन्यांना पूर्वीच्या काळापासून विशेष महत्व आहे. लग्न झाल्यानंतर महिला अनेक वेगवेगळे दागिने घालतात. त्यात हातात घालतंय जाणाऱ्या हिरव्या बांगड्याना विशेष महत्व आहे. हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे पतीचे वय वाढते, अशी मान्यता आहे. हातामध्ये बांगड्या घालण्याची परंपरा वैदिक काळापासून चालत आली आहे. याचा पुरावा म्हणून हिंदू देवतांच्या हातामध्ये बांगड्या आहेत. हातामध्ये बांगड्या घालण्यामागे श्रृंगारासोबतच धार्मिक आणि वैज्ञानिक करणे सुद्धा आहेत. चला तर जाणून घेऊया लग्न झाल्यानंतर महिला हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या का घालतात? जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य-pinterest)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
मराठी संस्कृतीमध्ये हिरवा रंग अतिशय शुभ मानला जातो. लग्नाच्या दिवशी नवीन नवरीच्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा चुडा भरला जातो. कारण विवाहित जीवनाची सुरुवात सर्जनशील, सकारात्मक, गोड, प्रेमळ आणि समृद्धीने होण्यासाठी हिरव्या रंगाचा चुडा भरला जातो. शिवाय नवीन घरातील नातेसंबंध प्रेमाने फुलतील आणि भरभराट होते.
लग्न झाल्यानंतर किंवा इतर वेळी महिला दोन्ही हातांमध्ये बांगड्या घालतात. मात्र यामागे धार्मिक दृष्टिकोन सुद्धा आहे. विवाहित महिलेने दोन्ही हातामध्ये बांगड्या घातल्यामुळे पतीला दीर्घायुष्य लाभते. 16 श्रृंगारामधील हिरव्या बांगड्या हा एक शृंगार आहे. त्यामुळे दुर्गादेवीला दिल्या जाणाऱ्या नैवेद्यात बांगड्या आवर्जून दिल्या जातात. तसेच ज्योतिष शास्त्रानुसार हिरव्या बांगड्या दान केल्यामुळे बुध ग्रहाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि विवाहित महिलांना पुण्य मिळते. तर वास्तुशास्त्रानुसार हातामध्ये असलेल्या हिरव्या बांगड्यांच्या आवाजामुळे घरात सकारात्मक ऊर्जे वाढते.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
ज्या महिला हातामध्ये बांगड्या घालतात, त्यांचे शारीरिक आरोग्य चांगले राहते. शिवाय नियमित बांगड्या घातल्यामुळे श्वासांचे आणि हृद्यासंबंधित आजार बरे होतात. मानसिक संतुलन सुधारण्यासाठी हातामध्ये बांगड्या घालाव्यात. यामुळे महिलांना कमी थकवा जाणवतो. शिवाय मानसिक संतुलन सुधारते. विज्ञानानुसार, मनगटाच्या खालपासून ते ६ इंचापर्यंत एक्यूप्रेशर पॉइंट असतात, त्यांच्यावर आलेल्या दबावामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे नियमित महिलांनी हातामध्ये हिरव्या बांगड्या घालाव्यात.