दह्याचा नैसर्गिक गुणधर्म थंड असला तरी त्यात मसाल्याचे पदार्थ एकत्र केल्याने त्याचा गुणधर्म उष्ण होतो. जर तुम्ही घट्ट असलेलं दही खात असात तर खास थंडीच्या दिवसात दही खाताना त्यात थोडं कोमट पाणी मिक्स करा. त्यामुळे कफ होणार नाही. त्याचबरोबर दह्याला फोडणी देऊन खाणं हा देखील पर्याय आहे. फोडणी दिलेलं दही चवीला जसं छान लागतं तसंच ते आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. त एक चमचा राईचे तेल, जीरे, हींग आणि चवीनुसार लाल तिखटाची याची फोडणी दिलेल्या दह्याचं सेवन खास हिवाळ्याच्या दिवसात गुणकारी आहे. यामुळे गुमधर्म उष्ण होतो. हिवाळ्यात दह्याला किंवा ताकाला फोडणी देऊन खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.
दह्यात साखर टाकून खायला अनेकांना आवडतं. मात्र हिवाळ्यात दह्यासोबत साखर खाणं चवदार वाटत असलं तरी शरीरासाठी ते त्रासदायक ठरु शकतं. दही आणि साखर एकत्र खाल्याने सर्दीचा त्रास होऊ शकतो. मात्र काहींना दह्यात साखर टाकल्याशिवाय जमत नाही. जर तुम्हाला गोड दही आवडत असेल तर, साखरेऐवजी गुळाचा वापर करा.गुळ उष्ण असल्याने दह्याची चवही चांगली लागते आणि दह्याचा थंड गुणधर्मही संतुलित राहतो.
हिवाळ्यात शक्यतो घरी तयार केलेल्या दह्याचं सेवन करा. हिवाळ्यात ताजे दही खाणे फायदेशीर ठरते. हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून वाचण्यासाठी दह्याला फ्रिजमध्ये ठेवणे टाळा. दही नॉर्मल टेमप्रेचरमध्ये ठेवा यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास देखील होणार नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दही सकाळी किंवा संध्याकाळी खाऊ नये. दही खाण्याची योग्य वेळ दुपारची आहे. हिवाळ्यात दुपाऱच्या वेळी दही खाल्ल्याने कफाचा त्रास होण्याची शक्यता कमी असते.
Ans: आयुर्वेदानुसार दह्याचा गुणधर्म थंड असल्याने हिवाळ्यात दही खाल्ल्याने काही लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. मात्र काही उपाय पाळल्यास दही खाणं सुरक्षित ठरू शकतं.
Ans: दही शरीरातील कफ वाढवू शकते. थंडीच्या दिवसात शरीरात आधीच कफ वाढण्याची प्रवृत्ती असते, त्यामुळे दही घेतल्यास सर्दी-खोकला वाढू शकतो.
Ans: आरोग्यतज्ज्ञांच्या मते दही सकाळी किंवा रात्री खाऊ नये. हिवाळ्यात दही खाण्याची योग्य वेळ दुपारची आहे. या वेळी दही घेतल्यास कफाचा त्रास कमी होतो.






