हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात दिसून येतात ही लक्षणे
प्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांनी 15 डिसेंबरला रुग्णालयात अखरेचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते अनेक वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त होते. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को रुग्णालयात झाकीर हुसेन यांच्यावर उपचार सुरु होते. रविवारी त्यांना उपचारासाठी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र संध्याकाळी त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि त्यांचे निधन झाले. झाकीर हुसेन मागील काही दिवसांपासून उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त होते. तसेच त्यांना इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस आजार होता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
शरीराचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी हृदय महत्वपूर्ण भूमिका बजावते. पण सतत वातावरणात होणारा बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर होतो आणि शरीराचे कार्य बिघडून जाते. तसेच चुकीच्या सवयी फॉलो केल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. हृदयविकाराचा झटका येण्यामागे कोरोनरी आर्टरी डिसीज महत्वाचे मानले जाते. शरीरामध्ये हृदयविकाराची कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत चालू राहील.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. शरीरात रक्तदाब वाढल्यानंतर हृदयाचे नुकसान होते. ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या कमकुवत होऊन जातात. रक्त पंप करण्यासाठी हृदयाला जास्तीची मेहनत करावी लागते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि इतर समस्या उद्भवू शकतात.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा