उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. शिवाय यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. शरीरात उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवल्यानंतर शरीरातील उष्णतेचे नुकसान होते, रक्तवाहिन्या अकुंचन पावतात, ज्यामुळे शरीराचा रक्तदाब वाढतो. शरीरात रक्तदाब वाढल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. शिवाय घरगुती पदार्थांचे सेवन करून उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून आराम मिळवता येतो. त्यामुळे रोजच्या आहारात या बियांचे समावेश करावे. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
रक्तदाब नियंत्रण ठेवण्यासाठी या बियांचे करा सेवन
तुळशीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आढळून येतात, ज्यामुळे शरीराला आलेली सूज कमी होऊन आरोग्य सुधारते.
उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवल्यानंतर आरोग्य बिघडू लागते. त्यामुळे रोजच्या आहारात सूर्यफुलाच्या बियांचे सेवन करावे. यामध्ये विटामिन ई आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात आढळून येते.
चिया सीड्सचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवत नाही. यामध्ये आढळून येणारे फायबर आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड शरीरासाठी आवश्यक आहेत.
भोपळ्याच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम आणि झिंक आढळून येते. यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
अंबाडीच्या बियांचे सेवन केल्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते आणि आराम मिळतो. अंबाडीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे शरीराच्या रक्तवाहिन्या निरोगी राहतात.