ईडब्ल्युएस, ओबीसी, एसईबीसी वर्गातील मुलींना व्यावसायिक शिक्षणासाठी शंभर टक्के शुल्कमाफी
Pune Educational News: राज्य शासनाच्या ८ जुलै २०२४ रोजीच्या निर्णयानुसार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) तसेच इतर मागासवर्ग (OBC) या प्रवर्गांतील अशा विद्यार्थिनींना, ज्यांचे वार्षिक कुटुंब उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिक्षण व परीक्षा शुल्कात ५० टक्क्यांऐवजी १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत केवळ केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (CAP) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना लागू असेल.
उत्पन्न प्रमाणपत्र
जातीचा दाखला
महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र
आधार क्रमांक संलग्न असलेले बँक खात्याचे तपशील
शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थिनींच्या आधार संलग्नित बँक खात्यात जमा केली जाईल.
निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का ! ‘या’ माजी आमदाराने केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
महाविद्यालयांनी अर्ज प्रक्रियेसाठी विद्यार्थिनींसाठी संगणक, इंटरनेट आणि प्रिंटरसारख्या सुविधा विनामूल्य उपलब्ध करून द्याव्यात. तसेच तहसिलदार व बँक अधिकाऱ्यांच्या सहकार्याने शिबिरे आयोजित करून, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व आधार संलग्नीकरणाची कार्यवाही महाविद्यालयाच्या ठिकाणीच पार पाडावी.
प्रत्येक अर्जाची अचूक छाननी करून लिपिकांनी तत्काळ कार्यवाही करावी आणि नंतर ती प्राचार्यांच्या अंतिम मंजुरीसाठी सादर करावी. शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीची माहिती व प्रगती अहवाल उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक, पुणे विभाग यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे.