चांदूरबाजार : चांदूरबाजार तालुक्यात (Chandurbazar Taluka) जुलै व ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व संततधार पावसामुळे संत्रा पिकावर मोठा परिणाम झाला आहे. वातावरणात आद्रतेचे प्रमाण जास्त असल्याने संत्रा पिकावर अनेक अज्ञात व बुरशीजन्य रोगांनी आक्रमण केले आहे. परिणामी तालुक्यातील संत्रा पीकात मोठ्या प्रमाणात फळगळ सुरु झाली आहे. या फळगळीमुळे तालुक्यातील अंदाजे १५ हजार हेक्टर वरील संत्रा पीक धोक्यात (15 thousand hectares Orange crop danger) आले आहे.
संत्रा पीक हे सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे कॅश क्रॉप (Cash crop of farmers) झाले आहे. या अनैसर्गिक फळगळीने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. कारण या फळगळीचा संत्र्या उत्पादकांना मोठा आर्थिक फटका (Fruit drop big financial hit orange growers) बसत आहे. संत्रा हे नगदी पीक असल्याने शेतकरी आशेपोटी या पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. शेतातील संत्रा फळांची होणारी गळ पाहता पीकाला लावलेली लागतही निघेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. चिंतेत असलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी या पिकालाही आर्थिक मदत द्यावी, अशी याचना शासनाकडे केली आहे.
अतिवृष्टी व संततधार पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे स्थानिक महसूल (Local Revenue) व कृषी विभागाने (Department of Agriculture) केले आहेत. यात संत्रा पीकाचा समावेश नाही. अतिवृष्टीच्या पीक नुकसानी संत्रा पीकचा समावेश करावा, अशी मागणी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत कोणीही पाहू नये, राष्ट्रीय फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ (Scientists of the National Fruit Research Centre) व कृषी विभाग (Department of Agriculture) संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यास उदासीन आहे. या शेतकऱ्यांना किडी व रोगांचे वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले असते, तर फळगळीचा प्रश्न निर्माण झाला नसता. तालुक्यातील संत्रा फळगळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers affected by orange blight) शासनाने आर्थिक मदत द्यावी.
– प्रदिप बंड, जसापूर, संत्रा उत्पादक शेतकरी.