समृद्धी महामार्गावरून आता आनंददायी प्रवास करता येणार; 16 उपहारगृहे उभारली जाणार(फोटो सौजन्य-X)
संभाजीनगर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे चांगलाच चर्चेत आहे. पण, आता याच मार्गावर पेट्रोलपंपांनंतर भव्य 16 उपहारगृहे (फुड मॉल) उभारण्यात येणार आहेत. याचा फायदा या महामार्गावरून येणाऱ्या हजारो वाहनचालकांना होणार आहे. थांबा असल्याने संभाव्य अपघातांना आळा बसेल, असे सांगण्यात येत आहे.
समृद्धी महामार्गावर प्रवाशी वाहनचालकांसाठी जेवण-पाण्याशी संबंधित कुठलीही व्यवस्था नसून, न्यायालयाकडूनही यासंदर्भाने विचारणा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भव्य उपहारगृहे उभारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून हालचाली गतिमान झाल्या आहेत. महामार्गाच्या उतरोक्त 16 पेट्रोलपंपाजवळच मुंबई-पुणे महामार्गाच्या धर्तीवर भव्य उपहारगृहे उभारण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत एका फुडमॉलसाठी प्रस्ताव आला आहे. उर्वरीतसाठीही प्रक्रिया गतिमान झाली आहे.
मुंबई मार्गाच्या धतींवर समृद्धी महामार्गावरही फुड मॉल उभारण्याला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. 16 पेट्रोलपंपाशेजारीच हे फुडमॉल उभारण्यासाठी प्रस्ताव मागवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रशांत शेलके यांनी दिली.
हेदेखील वाचा : Samruddhi Highway : एकनाथ शिंदेंनी घेतलं हातात स्टेरिंग; समृद्धी महामार्गावरुन महायुतीची गाडी सुसाट
समृद्धीवरील संभाव्य 16 उपहारगृहांच्या भागात किमान 50 चारचाकी वाहने, मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, महिला, बचतगटात तयार होणारे वाळवणासारखे खाद्यपदार्थ, कलाकुसरीतील निर्मित वस्तु, चहापासून शाकाहारी, मांसाहारी जेवणासह हलक्या-फुलक्या नाश्त्यापर्यंची व शीतपेयापासून आईस्क्रीम ठेवण्याची व्यवस्था असेल.
सध्या 11 पेट्रोलपंप सुरू
समृद्धीवर ठाण्याकडून नागपूरच्या दिशेने करण्यात येणाऱ्या मार्गात सात ठिकाणी (बुलढाणा), शिवणी (अमरावती), रेणकापूर-माणकापूर (वर्धा) व वाईफल (नागपूर). तर नागपूरहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गात ११ पेट्रोलपंप सुरू आहेत. त्यात वाईफल, गणेशपूर व शिवणी (वर्धा), ताथोड आखत्याडा आदीचा समावेश आहे.