मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन (Mumbai Lifeline) असलेल्या लोकलमध्ये ११ जुलै २००६ रोजी बॉम्बस्फोटच्या (Bomb Blast) घटनेला आज १६ वर्षे पूर्ण होत आहेत. ११ मिनिटांमध्ये सात बॉम्बस्फोटात २०९ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७१४ जण जखमी झाले होते.
२००६ रोजी पश्चिम रेल्वेवर (Western Railway) पहिला बॉम्बस्फोट झाला. पुढे एकापाठोपाठ सात बॉम्बस्फोट झाल्याने मुंबई हादरली. पश्चिम रेल्वेच्या खाररोड, जोगेश्वरी, माहिम, मीरा रोड, माटुंगा, बोरीवली आणि वांद्रे या सात स्थानकामध्ये हे स्फोट झाले. यावेळी, २०९ जणांना जीव गमवावा लागला होता, तर ७१४ जण जखमी झाले. १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर पुन्हा एकदा मुंबई हादरली (Mumbai Trembled).
२००६ च्या लोकल बॉम्बस्फोटातील १२ जणांना २०१५ रोजी न्यायालयाने दोषी ठरवले होते. यातील कमाल अहमद अन्सारी, मोहंमद फैजल शेख, एहत्तेशाम सिद्दीकी, नावेद हुसेन खान, आसिफ खान यांना फाशीची शिक्षा (Death Penalty) सुनावण्यात आली. तर, तन्वीर अहमद अन्सारी, मोहंमद माजीद शफी, शेख आलम शेख, मोहंमद साजिद अन्सारी, मुझम्मील शेख, सोहेल शेख आणि जमीर शेख यांना जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावली आहे.