पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यातील सर्व विभागात पावसाचा जोर वाढला असून धरणात सध्या प्रतिसेकंद ४९ हजार ३२५ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. मागील चोवीस तासात धरणात ४.२६ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरणात सध्या ४०.६३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरातील पावसाचा जोर कायम आहे. मंगळवारी सायंकाळी ५ ते बुधवारी सायंकाळी ५ या २४ तासात कोयनानगर येथे १५९ (एकूण १६३३) नवजा १९१ (२०७९), महाबळेश्वर २२०२०४१ (१५९९) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या ४९ हजार ३२५ क्युसेक्स पाण्याची प्रतिसेकंद आवक होत असून धरणात ४०.६३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणी उंची २,०९५.०० फूट, जलपातळी ६३८.५५६ मीटर इतकी झाली आहे. १०५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्याप ६४.६२ टीएमसी पाण्याची आवश्यकता असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापणाने दिली.