गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) सुरू होवून सहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र, येथे अद्यापही विविध सोयी सुविधांचा अभाव (Lack of amenities) आहे. इमारत बांधकामाचा प्रश्न निधी आल्यामुळे मार्गी लागण्याच्या तयारीत आहे. कार्यरत डॉक्टरसुद्धा राजीनामा (working doctors resigned) देऊन परत जात आहेत. परिणामी डॉक्टरांच्या रिक्त पदांचे डोंगर (doctor vacancies Empty) वाढत आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्यविषयक चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात त्यांची नागपूरला जाण्याची पायपीट कमी व्हावी, यासाठी गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले. जीएमसीची स्वतंत्र इमारत नसल्याने सध्या कारभार केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय (KTS District General Hospital) व बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या (Bai Gangabai Women’s Hospital) इमारतीतून चालविण्यात येत आहे. मागील सहा वर्षांपासून या दोन्ही इमारंतीतून मेडिकलचा गाडा हाकला जात आहे.
गेल्या वर्षीच अंदाजपत्रकात इमारत बांधकामाच्या निधीला मंजुरी प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे येथील डॉक्टरांची २५ वर पदे पहिलेच रिक्त होती. त्यातच दोन वर्षांपूर्वी १५ डॉक्टरांनी राजीनामे दिले. त्यामुळे मेडिकलच्या समस्येत अधिक भर पडली आहे. ४० वर डॉक्टरांची पदे रिक्त (40 Doctors post vacant) असल्याने रुग्णावर उपचार करताना मोठी अडचण जात आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे रोग वाढले असून मेडिकलच्या बाह्यरुग्ण तपासणी विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत चालली आहे. मात्र, डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे कार्यरत डॉक्टरांवरसुद्धा ताण वाढत आहे. मात्र, अद्यापही ही रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य विभागाने कुठलीच पाऊले उचलली नाही.