अमरावती : आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी त्यांचे मतदार संघातील मौजे अंजनगाव बारी (Anjangaon Bari) अमरावती (Amravati) येथील गावातील नागरिकांना पिण्याचे पाण्यासाठी नेहमीच हाल व्हायचे हिचं परिस्थिती आमदार रवी राणा यांनी राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या कडे मांडली. त्यांच्या मागणीची दखल घेत शासन निर्णयानुसार अंजनगाव बारी येथील तात्पुरत्या पूरक पाणी पुरवठा योजनेच्या रुपये ४४.०५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली.
शासनाचे आदेश विभागीय आयुक्त अमरावती (Divisional Commissioner Amravati) यांना प्राप्त झाले आहेत. प्रशासकीय मान्यतेमध्ये नमूद १ ते ९ अटीनुसार विहीत मुदतीत कामे पूर्ण करुन कामाच्या पूर्णत्वाचा अहवाल शासनास तथा या कार्यालयास सादर करण्यात यावा, असेही आदेश जिल्हाधिकारी अमरावती (Collector Amravati) कार्यालयाला दिले आहे. या संबंधित उपआयुक्त वासनिक यांची उमेश ढोणे, सुनील नीचत, उमेश डकरे आदींनी भेट घेत तातडीने कार्यवाही करत पिण्याचे पाणी पुरवठा योजना लवकर सुरू करण्याची मागणी केली असता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांनाही लेखी पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर केल्याबद्दल आ. रवी राणा व गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे.