मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील 65 किमी व्हाईट टॉपिंग पूर्ण
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मार्फत मुंबई अहमदाबाद महामार्गावर होणाऱ्या कामाची माहिती आज (9 जुलै) भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकारी यांनी पत्रकार परिषेदतअधिकारी सुहास चिटणीस यांनी प्रकल्पाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. यामध्ये 610 करोडचा निधी वापरून संपूर्ण 121 किमी लांबीच्या रस्त्याचे व्हाईट टोपिंगचे काम करण्यात येणार आहे, याचे कंत्राट सुद्धा कंपनीला देण्यात आले आहे. व्हाईट टॉपिंग हा बांधकामाचा प्रकार विशेष नाम अतिवृष्टी असलेल्या भागात केला जातो. यामध्ये वडोदरा मुंबई धुतगती मार्ग मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग ठाणे वडपे लेणी प्रकल्प पनवेल ते इंदापूर महामार्ग नाशिक पेठ विशेषतः या महामार्गावर या बांधकामाचा प्रकार अवलंब करण्यात आलेला आहे. तसेच या महामार्गावर इतर एजन्सी सर्विस रोडवरील काम करत आहेत.
यामध्ये एमएमआरडीए व्हीएमसी यांच्यामार्फत होणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम , अदानी इलेक्ट्रिसिटी यांच्या केबल साठी लागणार खोदकाम तसेच मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मार्फत होणाऱ्या सर्विस रोडचे काम याबाबत या भविष्यातील कामासाठी अडथळे निर्माण होत असताना, सुद्धा एकंदरीत तंत्रज्ञाने खूप चांगली प्रगती केली असून अंदाजे सहा महिन्यात 65 किलोमीटर पेक्षा जास्त व्हाईट टपिंगच्या सहा यांच्या काम पूर्ण केलेले आहे. तसेच याच्या व्यतिरिक्त गर्दीच्या वेळी होणारे वाहतूक कोंडी वाहनांच्या चुकीच्या बाजूने येजा करण्यामुळे परिस्थिती बिकट होते. तसेच उन्हाळा जड वाढत जास्त प्रमाणात बंद पडत असल्यामुळे आधीच कमी झालेला लेनमध्ये वाहतूक कोंडीचा अडथळा निर्माण होतो. तसेच काम चालू असलेला ठिकाणी वाहने चुकीच्या बाजूने चालवून प्लॅन क्रॉस करताना वाहतूक कोंडी होते आणि वाहनांच्या लांब रांगा ज्यामुळे विरुद्ध देखील गती कमी होते वाहतूक ठप्प होते. त्यामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण होतो तसेच जड वाहनांना मनोहर वाडा भिवंडी शिरसाट, पारोळ भिवंडी आणि चिंचोटी भिवंडी या पर्यायी मार्गाने मिळवण्याची विनंती प्रशासनांना करण्यात आली होती परंतु चुकीच्या बाजूने वाहने चालवले जात असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्या मध्ये अजून भर पडून परिस्थिती बिकट झालेली आहे.
तरी याबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मार्फ़त उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये कंत्राटदाराने वाहतूक पोलिसांच्या नियंत्रणाखाली 100 हुन अधिक वाहतूक वार्डन तैनात केलेले आहेत , तसेच कंत्राटदाराकडून अपघात विभागासाठी तीन मोठे क्रेन तसेच पेट्रोलिंग गाड्या तसेच तीन रुग्णवाहिका पुरवण्यात आलेले आहेत याच्या व्यतिरिक्त महामार्गावरती वाहनांमध्ये बिघाड झाल्यानंतर किंवा अपघात झाल्यानंतर इत्यादी समस्या हाताळण्यासाठी अतिरिक्त क्रेन देखील पुरवल्या गेलेल्या आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीने तोंड देण्यासाठी यंत्रसाम्रगी, मनुष्यबळ आणि इतर साहित्यांचा साठा पुरवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. रस्त्याच्या कामाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी व माहिती करिता अतिरिक्त संकेत फलक लावण्यात आलेले आहेत , व्हाईट टॉपिंगचे खड्डे दुरुस्त केले जात आहेत आणि खराब झालेले फरक पावसाळ्यानंतर बदलले जाणार आहेत असं सांगण्यात आलेले आहे. तसेच घोडबंदर या ठिकाणी आरसीसी नालाही बांधण्यात आलेला आहे गेल्या पावसाळ्यात उगवलेली भीषण पाणी साचण्याची समस्या यावेळी उद्भवणार नाही आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलेल आहे दरवेळी अनेक समस्यांबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला जबाबदार ठरलं जाते परंतु त्यांना काम करताना किती समस्यांना तोंड द्यावे लागते याचा विचार कोणी करत नाही ?याबाबतही तोडगा निघावा यासाठी ही प्रयन्त आम्ही करू असा विश्वास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांनी व्यक्त केला.