पालघरमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू (फो- istockphoto)
पालघर: पालघरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. पालघरमध्ये 21 व्या मजल्यावरून पडून 7 महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हल्ली मोठ्या मोठ्या शहरांमध्ये अनेक मजल्यांच्या इमारती उभ्या राहत आहेत. दरम्यान आपल्या घरी लहान मुले असतील तर बाल्कनी, खिडक्या सुरक्षित आहेत की नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. कारण याच उंच इमारतीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. 21 व्या मजल्यावरून पडून 7 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे.
पालघरमध्ये ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एक कुटुंब एका इमारतीच्या 21 व्या मजल्यावर राहत होते. त्यांना सात महिन्यांचे एक बाळ होते. त्या बाळाला झोप येत नसल्याने त्याची आई कुशीत घेऊन मास्टर बेडरूममध्ये फेऱ्या मारत होत्या. बाहेरून हवा यावी आणि त्यामुळे बाळाला झोप यावी यासाठी बाल्कनीची स्लायडिंग उघडी ठेवली होती.
मात्र त्या खोलीतील लादी ओलसर असल्याने आईचा पाय घसरला. पाय घसरल्याने त्या थेट बाल्कनीच्या दिशेने पडल्या. या घटनेत त्यांच्या हातात असलेले 7 महिन्यांचे बाळ बाल्कनीमधून थेट खाली पडला. त्यानंतर बाळाला लगेचच रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पालघरमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना अपघाती असल्याचे झालेल्या घटनेवरून समजते आहे.
दिल्लीमध्ये दररोज होतो सरासरी २० बालकांचा मृत्यू
राजधानी दिल्लीमध्ये नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. जन्माला आल्यानंतर वर्षभराच्या आतमध्ये जवळपास एका दिवसाला २० पेक्षा जास्त बालकांचा मृत्यू होतो. बालकांच्या मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे. गर्भधारणेदरम्यान अयोग्य विकास, कुपोषण, न्यूमोनिया आणि सेप्टिसीमिया इत्यादी आजारांची लागण बालकांना होण्याची शक्यता असते. आईच्या गर्भात बाळाचा योग्य विकास न झाल्यामुळे बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या आकडेवारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे, मात्र अजूनही गरजूंपर्यंत कोणत्याही सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत.
आईच्या गर्भात बाळाचा योग्य विकास न होणे, रुग्णालयातील अपुऱ्या सोयीसुविधा इत्यादी अनेक कारणांमुळे बाळाच्या आरोग्याला धोका पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे नवजात बालकांचे प्राण वाचवण्यासाठी आरोग्यसुविधा पुरवणे आवश्यक आहे. बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी गर्भाशयतच बाळाची काळजी घेणे आवश्यक आहे. बालकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी यंदाच्या वर्षीच्या थीममध्ये जास्त भर दिला जाईल.
गर्भवती मातांच्या प्रसूतीमध्ये 95.58 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्यामुळे माता मृत्युदर 0.50 पेक्षा कमी झाला आहे.पण 2023 मध्ये 142 गर्भवती महिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे दिल्लीच्या आरोग्य यंत्रणेवर नवजात बालक आणि अर्भक मृत्यू दर कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. बालकांच्या आकडेवारीचा दर वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मागील चार वर्षांमध्ये बालकांच्या मृत्यूचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे.