चिखलदरा : चिखलदरा पोलीस ठाण्याच्या (Chikhaldara Police Station) हद्दीत एका तरुणावर दोन जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार (Gang sexual abuse) केला. ही धक्कादायक घटना १३ ऑगस्ट रोजी चिखलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. ४२ वर्षीय महिलेने या घटनेची तक्रार १३ ऑगस्ट रोजी चिखलदरा पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार चिखलदरा पोलिसांनी आरोपी सुनील मनोहर दहिकर (३०) व सुखराम नानकराम धांडे (३०, दोन्ही रा. धारणी) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला.
४२ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी हे परतवाड्याकडून धारणीकडे जात असताना, पिडित २० वर्षीय तरुणी सेमाडोह चौकात (Semadoh Square) उभी होती. त्यावेळी, आरोपींनी संगमनत करून तरुणीला दुचाकीवर बसविले आणि पिली येथील जंगलात (forest at Pili) नेले. तेथे तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार (Alternate sexual abuse) केला, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.