पुणे : पत्नीसोबत घटस्फोटाची केस (Divorce Case) सुरू असल्याचे सांगत लग्नाचे आमिष दाखवून महिलेसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर, शारिरीक संबंध (Physical Relationship) ठेवण्यासाठी महिलेला ‘तुझ्या मुलाला जीवे मारेल व बदनाम करेल’, अशी धमकीही देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
प्रल्हाद रामदास तांदळे (वय ३६, रा. उत्तमनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत ३७ वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या आरोपी ओळखीचा आहे. त्याने तक्रारदार यांना माझा पत्नीसोबत घटस्फोटाचा दावा सुरू असल्याचे सांगत त्यांना लग्न करण्याचे आमिष दाखविले.
तसेच, त्यांच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मात्र, त्यांना बदनाम करण्याची व मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यास सुरूवात केली. त्या काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांना शरीरसंबंध न ठेवल्यास बघून घेण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.