बारामती: आज लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. बारामतीमध्ये थेट लंडनहून आलेल्या युवकाने मतदान केले आहे. बारामती तालुक्यातील रहिवासी असलेल्या साहिल संजीव बोराटे हा तरुण परदेशात शिकत आहे. या युवकाने खास भारतीय लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी संविधानाने दिलेला हक्क बजावण्यासाठी आपल्या गावी येऊन मतदानाचा हक्क बजावला.
प्रत्येकाचं मत महत्वाच आहे. सर्वाचा सहभाग हाच लोकशाहीचा पाया आहे. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि लोकशाहीने दिलेला हा आपला अधिकार आहे. या ब्रीदवाक्यानुसार खास ‘भारतीय लोकसभा निवडणूक 2024’ यासाठी खास मतदान करण्यासाठी आला. साहिल संजीव बोराटे हा ‘युनायटेड किंगडम’ (लंडन) येथे उच्च शिक्षण घेत आहे. तो ‘युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपुल’ येथे ‘मास्टर इन ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट’ हा मॅनेजमेंट अभ्यासक्रम करीत आहे. खास भारतीय संविधान आणि आपल स्वतःच राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी तो बारामतीत मतदानासाठी आला आहे.
Web Title: A celebration of democracy a young man from london exercised his right to vote in baramati loksabha elections nrpm