US Iran War : पृथ्वीवरील एक मोठा कॅन्सर...; इराणशी वादादरम्यान ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य, सांगितला युद्धाचा पुढील प्लॅन (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
US Iran War : मध्यपूर्वेतील युद्धात मोठा ट्विस्ट! इराणने अमेरिकन सैन्याला घेतलं ताब्यात? जगभरात खळबळ
ट्रम्प यांनी इराणच्या लष्करी शक्तीबाबात आणि भविष्यातील तेल बाजारावर मोठा दावा केला आहे. इराणच्या लष्करी क्षमतेवर बोलताना त्यांनी म्हटले की, अमेरिका-इस्रायलने त्यांच्या नौदलाला पूर्णपणे नष्ट केले आहे. या मोहिमेला केवळ एक छोटी मोहिम म्हटले आहे. सध्या इराणला पूर्णपणे नष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, तेहरानमधील इराणच्या अनेक लष्करी तळांवर आणि पायभूत सुविधांवर अमेरिका सतत हल्ले करत आहे. इस्रायलकडूनही बॉम्बफेक सुरु आहेत.
या युद्धाचे समर्थन करत ट्रम्प यांनी इराण राजवट जगातील मोठा कॅन्सर असल्याचे म्हटले. त्यांना या कॅन्सरला मुळापासून उपटून टाकू, केवळ अमेरिका-इस्रायलसाठी नाही तर संपूर्ण जगासाठी इराण एक धोका असल्याचे म्हटले. जगाच्या शांतेतेसाठी आम्ही महान कार्य करत आहोत अशी बढाई देखील त्यांनी मारली.
याच वेळी ट्रम्प यांनी जागतिक बाजारातील तेलाच्या किंमतीवर बोलताना म्हटले की, सध्या कच्चा तेलाच्या किमती वाढल्या आहेत. सुरुवातील या वाढतील यात शंका नाही, परंतु युद्ध संपल्यानंतर त्या तितक्याच वेगानेही कमी होतील असे म्हटले आहे. हे विधान जगातकि बाजारपेठेसाठी अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. पण याच वेळी सौदी अरेबियाच्या ऑईल फील्डसवर मोठा हल्ला झाला आहे.
सध्या मध्यपूर्वेत प्रचंड अस्थिरता पसरली आहे. इराणनही सतत अमेरिकेवर हल्ला करत आहे. नुकतेच इराणने अमेरिकन सैन्याला ताब्यात घेतल्याचाही दावा केला आहे. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.
VIDEO | On Board Air Force One: On Iran war, US president Donald Trump (@POTUS) says, “We’ve wiped out their navy. Their navy is now at the bottom of the sea. So that’s the choice. This is an excursion. We figured oil prices would go up, which they will. They’ll also come down.… pic.twitter.com/7a0zhDDNUD — Press Trust of India (@PTI_News) March 8, 2026
Ans: ट्रम्प यांनी इराणवरी हल्ल्याबाबत बोलताना म्हटले की, अमेरिका-इस्रायलने केलेल्या संयुक्त कारवाईत इराणची नौदल क्षमता मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे. ही कारवाई मोठा धोका दूर करण्यासाठी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Ans: ट्रम्प यांच्या मते, युद्धामुळे तेलाच्या किंमती वाढू शकतात, परंतु नंतर त्या वेगाने कमीही होतील.






